ऑस्ट्रेलियात बनत आहे पहिला मानव ‘ब्रेन-स्केल’ कॉम्प्युटर
सिडनी : ऑस्ट्रेलियातील संशोधक जगातील पहिला ब—ेन-स्केल कॉम्प्युटर बनवत आहेत, जो पुढील वर्षी ऑनलाईन होईल. ‘डीपमाऊथ’ नावाचा हा सुपरकॉम्प्युटर सिडनीमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर न्यूरोमॉर्फिक सिस्टम्सद्वारे इंटेल आणि डेलबरोबरच्या भागीदारीत बनवला जात आहे. हा सुपरकॉम्प्युटर वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीत बनवला जाईल.
सामान्य कॉम्प्युटरच्या विपरित ‘डीपसाऊथ’च्या हार्डवेअर चिप्सला स्पायकिंग न्यूरल नेटवर्कला लागू करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, जे मेंदूत सूचनांना संसाधित करण्याच्या पद्धतीला मॉडल करते. न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटर यापूर्वीही बनवले गेले आहेत, पण ‘डीपसाऊथ’ आतापर्यंतचा सर्वात मोठा असेल. हा सुपरकॉम्प्युटर प्रति सेकंद 228 ट्रिलियन सिनॅप्टिक ऑपरेशन करण्यास सक्षम असेल ज्या मानवी मेंदूत सिनॅप्टिक ऑपरेशनच्या अनुमानित संख्येइतकी आहे. ‘आयसीएनएस’ सदस्य आणि प्रोजेक्ट लीड आंद्रे व्हॅन शेख यांनी सांगितले की डीपमाऊथ सध्याच्या कोणत्याही सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत अधिक शक्तिशाली जरी नसला तरी तो न्यूरोमॉर्फिक कम्प्यूटिंग आणि जैविक मेंदूची क्षमता वाढवण्यास मदत करील. मेंदू कसा काम करतो हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे राल्फ एटियेन-कमिंग्ज यांनी सांगितले की डीपसाऊथ विज्ञानाच्या अध्ययनाला अधिक वेगवान करील कारण संशोधक मेंदूच्या मॉडेलचे वारंवार परीक्षण करण्यास सक्षम असतील. वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार डीपसाऊथ अतिशय कमी विजेचा वापर करून सुपरफास्ट, विस्तृत समांतर संस्करणाची सुविधा देईल. डीपसाऊथचा आणखी एक लाभ ‘एआय’मध्ये होईल. मेंदूची नक्कल करून आपण सध्याच्या मॉडेल्सच्या तुलनेत एआय प्रक्रिया करण्यासाठी अधिक सक्षम होऊ.
The post ऑस्ट्रेलियात बनत आहे पहिला मानव ‘ब्रेन-स्केल’ कॉम्प्युटर appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या ऑस्ट्रेलियात बनत आहे पहिला मानव ‘ब्रेन-स्केल’ कॉम्प्युटर
ऑस्ट्रेलियात बनत आहे पहिला मानव ‘ब्रेन-स्केल’ कॉम्प्युटर
सिडनी : ऑस्ट्रेलियातील संशोधक जगातील पहिला ब—ेन-स्केल कॉम्प्युटर बनवत आहेत, जो पुढील वर्षी ऑनलाईन होईल. ‘डीपमाऊथ’ नावाचा हा सुपरकॉम्प्युटर सिडनीमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर न्यूरोमॉर्फिक सिस्टम्सद्वारे इंटेल आणि डेलबरोबरच्या भागीदारीत बनवला जात आहे. हा सुपरकॉम्प्युटर वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीत बनवला जाईल. सामान्य कॉम्प्युटरच्या विपरित ‘डीपसाऊथ’च्या हार्डवेअर चिप्सला स्पायकिंग न्यूरल नेटवर्कला लागू करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, जे …
The post ऑस्ट्रेलियात बनत आहे पहिला मानव ‘ब्रेन-स्केल’ कॉम्प्युटर appeared first on पुढारी.