बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे जेल, ५० लाख दंड

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे कारावास आणि ५० लाख रुपये दंडाची तरतूद आता लागू होणार आहे. इथून पुढे सिम कार्ड घ्यायचे, तर बायोमेट्रिक ओळख पटणे आवश्यक झालेली असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेले टेलिकम्युनिकेशन विधेयक २०२३ (Telecom Bill 2023) बुधवारी मंजूर झाले. आता राज्यसभेत ते मंजूर झाल्यानंतर … The post बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे जेल, ५० लाख दंड appeared first on पुढारी.

बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे जेल, ५० लाख दंड

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे कारावास आणि ५० लाख रुपये दंडाची तरतूद आता लागू होणार आहे. इथून पुढे सिम कार्ड घ्यायचे, तर बायोमेट्रिक ओळख पटणे आवश्यक झालेली असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेले टेलिकम्युनिकेशन विधेयक २०२३ (Telecom Bill 2023) बुधवारी मंजूर झाले. आता राज्यसभेत ते मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीला पाठविले जाईल.
टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना सिम कार्ड देताना त्यांची बायोमेट्रिक ओळख करून घ्यावी, असे विधेयकात स्पष्ट नमूद केलेले आहे. तसे न केल्यास अनुषंगिक परिणाम संबंधित कंपन्यांनाही भोगावे लागतील. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव कुठल्याही टेलिकॉम सेवा कंपनीस तसेच नेटवर्क कंपनीस ताब्यात घेण्याचा, कंपनीच्या व्यवस्थापनाचा अथवा कंपनीला निलंबित करण्याचा अधिकार या विधेयकानंतर सरकारला प्राप्त होणार आहे. युद्धसदृश परिस्थितीत सरकार टेलिकॉम नेटवर्कवरील मेसेजेस मिळवू शकेल. (Telecom Bill 2023)
हे विधेयक दूरसंचार क्षेत्राचे नियमन, नियंत्रण करणाऱ्या १३८ वर्षांपूर्वीच्या भारतीय टेलिग्राफ अधिनियमाची जागा घेईल. शिवाय, भारतीय बिनतारी टेलिग्राफ कायदा १९३३ आणि टेलिग्राफ वायर्स कायदा १९५० या नव्या कायद्याने रद्दबातल ठरतील. ‘ट्राय’च्या १९९७ च्या कायद्यातही या विधेयकान्वये दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. परवाना पद्धतीत होणार बदल या विधेयकाने परवाना पद्धतीतही बदल होईल. सद्यस्थितीत सेवापुरवठादाराला विविध प्रकारच्या सेवांसाठी वेगवेगळे परवाने, परवानग्या, अनुमोदने आणि नोंदण्या कराव्या लागतात. त्यातही पुरवठादारांच्या दृष्टीने सकारात्मक बदल होतील.
ई-कॉमर्स, ऑनलाईन मेसेजिंग कक्षेतून वगळले (Telecom Bill 2023)
ई-कॉमर्स, ऑनलाईन मेसेजिंग या बाबी टेलिकॉम सेवेच्या व्याख्येतून वगळल्या आहेत. गतवर्षी विधेयकाच्या कक्षेत ओटीटी सेवाही होत्या. त्याला इंटरनेट कंपन्यांनी आणि काही सामाजिक संस्थांनी हरकत घेतली होती. यानंतर ओटीटी सेवाही कक्षेतून वगळल्या गेल्या होत्या.
The post बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे जेल, ५० लाख दंड appeared first on Bharat Live News Media.

Go to Source