सोलापूर : सोहाळे येथे हिटरच्या स्फोटात तिघे गंभीर जखमी; उकळते पाणी घरभर पसरल्याने मोठी दुर्घटना

मोहोळ; पुढारी वृतसेवा : घरगुती हिटरचा स्फोट होऊन पाचशे लीटरची टाकी फुटली. व उकळते पाणी घरात पसरले. झोपेत असताना उकळत्या पाण्याने भाजल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे मंगळवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रात्री झोपताना स्वीच बंद करायचे विसरल्याने ही दुर्घटना घडली. उकळत्या पाण्याने गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही सोलापूरच्या छत्रपती … The post सोलापूर : सोहाळे येथे हिटरच्या स्फोटात तिघे गंभीर जखमी; उकळते पाणी घरभर पसरल्याने मोठी दुर्घटना appeared first on पुढारी.

सोलापूर : सोहाळे येथे हिटरच्या स्फोटात तिघे गंभीर जखमी; उकळते पाणी घरभर पसरल्याने मोठी दुर्घटना

मोहोळ; Bharat Live News Media वृतसेवा : घरगुती हिटरचा स्फोट होऊन पाचशे लीटरची टाकी फुटली. व उकळते पाणी घरात पसरले. झोपेत असताना उकळत्या पाण्याने भाजल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे मंगळवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रात्री झोपताना स्वीच बंद करायचे विसरल्याने ही दुर्घटना घडली. उकळत्या पाण्याने गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील ९ वर्षाचा मुलगा ७० टक्के भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद सिव्हील चौकी पोलीस ठाण्यात झाली आहे.
मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे समाधान सदाशिव जगताप (वय-३५ वर्ष) पत्नी दिपाली समाधान जगताप (वय-३०वर्ष) व मुलगा अजिंक्य समाधान जगताप ( वय- ९ वर्ष ) हे तिघे राहतात. कडाक्याची थंडी असल्याने त्यांनी घरात ५०० लीटरच्या टाकीचा हिटर बसवून घेतला होता. मंगळवारी (दि.१९) रात्री झोपण्यापूर्वी काही कामानिमित्त पाणी गरम करण्यासाठी हिटरचे बटण चालू केले. मात्र ते बंद करण्याचे विसरून ते तिघेही झोपी गेले. हिटरच्या टाकीतील पाणी उकळून टाकीचा स्फोट झाला. व उकळते पाणी घरात पसरले. आई वडिलांसह मुलगा झोपेत असताना हे उकळते पाणी अंथरूणात शिरले. उकळत्या पाण्यामुळे भाजल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस ठाण्यात झाली आहे.

“सध्या थंडीचे दिवस आहेत.घरोघरी हिटर, शेगडीसह इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जात आहे. मात्र ही विजेची उपकरणे वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. रात्री झोपताना ही उपकरणे बंद केली आहेत का ? याची खात्री करावी, अन्यथा छोटीशी चूक जीवावर बेतू शकते.
– राजकुमार डुणगे , सहायक पोलीस निरीक्षक , कामती पोलीस ठाणे , ता. मोहोळ

The post सोलापूर : सोहाळे येथे हिटरच्या स्फोटात तिघे गंभीर जखमी; उकळते पाणी घरभर पसरल्याने मोठी दुर्घटना appeared first on Bharat Live News Media.

Go to Source