चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा बुडून मृत्यू, राखेच्या ढिगारा कोसळल्याने दुर्घटना

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  वरोरा तालुक्यातील नंदोरी येथे गिट्टी खाणीत मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा राखेच्या ढिगाऱ्याखाली बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी घडली.  रामचंद्र जंगेल (६०) व योगेश जंगेल (२७) अशी मृतांची नावे आहेत. वरोरा तालुक्यातील नंदोरी  येथील काळ्या गिट्टीच्या खाणीच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून तिथे माशांची उत्पत्ती झालेली आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पंकज जैन … The post चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा बुडून मृत्यू, राखेच्या ढिगारा कोसळल्याने दुर्घटना appeared first on पुढारी.

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा बुडून मृत्यू, राखेच्या ढिगारा कोसळल्याने दुर्घटना

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा :  वरोरा तालुक्यातील नंदोरी येथे गिट्टी खाणीत मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा राखेच्या ढिगाऱ्याखाली बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी घडली.  रामचंद्र जंगेल (६०) व योगेश जंगेल (२७) अशी मृतांची नावे आहेत.
वरोरा तालुक्यातील नंदोरी  येथील काळ्या गिट्टीच्या खाणीच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून तिथे माशांची उत्पत्ती झालेली आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पंकज जैन यांच्या मालकीच्या गिट्टी खाणीत स्थानिक मजूर रामचंद्र जंगेल व योगेश जंगेल हे दोघे बापलेक आज सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते.
पाण्याजवळ जात असतानाच राखेचे ढिगारे खचल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती सोबतच्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगितली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बापलेकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी या खाणींमध्ये सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे. घटनेबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
The post चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा बुडून मृत्यू, राखेच्या ढिगारा कोसळल्याने दुर्घटना appeared first on Bharat Live News Media.

Go to Source