गडचिरोली : शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना जेवणातून विषबाधा

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. यातील २० विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हकविण्यात आले आहे. सोडे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत पहिली ते बारावी पर्यंत शिक्षणाची सोय असून सुमारे ३६९ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेत … The post गडचिरोली : शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना जेवणातून विषबाधा appeared first on पुढारी.

गडचिरोली : शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना जेवणातून विषबाधा

गडचिरोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. यातील २० विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हकविण्यात आले आहे.

सोडे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत पहिली ते बारावी पर्यंत शिक्षणाची सोय असून सुमारे ३६९ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेत आज ३५८ विद्यार्थिनी उपस्थित होत्या नेहमी प्रमाणे आज दुपारी विद्यर्थिनींना मध्यान्ह भोजन देण्यात आले. सर्वांनी जेवण केल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही विद्याथीनिना अचानक पोटात दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, डोके दुखणे, भोवळ येणे अशा प्रकारचे त्रास होऊ लागले. त्यांनी याबाबत मुख्याध्यापकांना माहिती दिली त्यानंतर अधीक्षकांनी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना घटनेबाबत सांगितले. काही वेळातच विद्यर्थिनींना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पुन्हा संध्याकाळी आणखी काही विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली त्यांनाही संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरती करण्यात आले.  धानोरा ग्रामीण रुग्णालयात एकूण १०७ विद्यार्थिनींना भरती करण्यात आले यापैकी २० विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानें त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे यांनी दिली. अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सोडे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत पघटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन चौकशी केली.

The post गडचिरोली : शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना जेवणातून विषबाधा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source