INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे मैदानावर कसोटी सामना
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : INDW vs AUSW : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमध्ये गुरुवारपासून कसोटी सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना होणार असून, जवळपास 40 वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघ भारतीय मैदानावर कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी 1984 मध्ये दोन्ही संघांदरम्यान 4 सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ही मालिका बरोबरीत सुटली होती.
भारतीय संघाने नुकताच इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला. तो फॉर्म ऑस्ट्रेलियाविरुद्धही कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सांगितले. तो सामना लगेच संपल्यामुळे जादा सुट्टी मिळाली, त्यामुळे खेळाडूंना फ्रेश होण्यास चांगली मदत झाली, असेही तिने सांगितले.
दुसरीकडे अलिसा हिलीच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ नव्याने सुरुवात करीत आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवलेल्या मेग लॅनिंगने भारताच्या दौर्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर हिलीकडे ही जबाबदारी देण्यात आली. मेगने घालून दिलेला वारसा पुढे चालवण्यास आपण उत्सुक असल्याचे हिलीने सांगितले. भारताचा हा दौरा आपल्यासाठी कठीण आव्हान असल्याचेही ती म्हणाली.
भारत वि. ऑस्ट्रेलिया एकमेव कसोटी सामना
स्थळ : वानखेडे स्टेडियम
वेळ : सकाळी 9.30 वा.
The post INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे मैदानावर कसोटी सामना appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे मैदानावर कसोटी सामना
INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे मैदानावर कसोटी सामना
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : INDW vs AUSW : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमध्ये गुरुवारपासून कसोटी सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना होणार असून, जवळपास 40 वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघ भारतीय मैदानावर कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी 1984 मध्ये दोन्ही संघांदरम्यान 4 सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ही मालिका बरोबरीत सुटली होती. भारतीय …
The post INDW vs AUSW: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडे मैदानावर कसोटी सामना appeared first on पुढारी.