उपराष्ट्रपती जगदीप धनखड अवमान प्रकरण : राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली होती. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. या संदर्भातली माहिती एक्सद्वारे स्वतः उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली. तसेच याच प्रकरणावरुन जाट समाजानेही दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयासमोर आणि भाजपच्या महिला खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करत असताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडिओ काढला होता. त्यामंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. संसद परिसरात झालेल्या या घटनेवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, की आपल्या शेतकरी आणि जाट पार्श्वभूमीला लक्ष केल्यामुळे मी वैयक्तिकरित्या दुखावलो. हा केवळ शेतकरी आणि एका समाजाचा अवमान नाही तर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतींचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यासंबंधी एक्सवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसद परिसरात उपराष्ट्रपतींचा ज्याप्रकारे अपमान झाला ते पाहून मला वाईट वाटले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वत:ला अभिव्यक्त करण्यास स्वतंत्र असले पाहिजेत, परंतु त्यांचे अभिव्यक्ती सन्मान आणि सौजन्याच्या निकषांमध्ये असावी, हीच संसदीय परंपरा आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि भारतातील लोक ती परंपरा कायम राखतील अशी अपेक्षा आहे. अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. काही खासदारांच्याद्वारे संसद परिसरात करण्यात आलेल्या अपमानजनक नकलेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. तसेच ते स्वतः अशा प्रकारचा अपमान गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सहन करत आहेत. मात्र संवैधानिक पद असलेल्या देशाच्या उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीबद्दल अशी नक्कल करणे आणि तेही संसद परिसरात असे होणे हे दुर्दैवी आहे. अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या तर अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आपले कर्तव्य निभवण्यात मी कमी पडणार नाही. संविधानाद्वारे दिलेल्या जबाबदारी पार पाडणार आणि संवैधानिक मूल्यांच्या प्रति आपण कटिबद्ध आहोत. अशा प्रकारचा कुठलाही अपमान मला माझे कार्य करण्यापासून विचलित करू शकत नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे जाट समाजातून येतात. त्यांची शेतकरी पार्श्वभूमी आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांच्याद्वारे केलेल्या कृत्यामुळे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अपमान झाला म्हणत जाट समाजाच्या वतीने दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांच्या अपमान प्रकरणी भाजपच्या महिला खासदारांनीही निदर्शने केली. संसद परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ भाजपच्या महिला खासदारांनी विरोधी पक्षांच्या विरुद्ध निदर्शने केली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींविरुद्ध नाराजी व्यक्त केल्याचे समजते. खासदार निदर्शने करत असताना किंवा विरोध प्रदर्शन करत असताना राहुल गांधींनी या प्रकरणाचा व्हिडिओ करायला नको होता. तो व्हिडिओ केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले, असे म्हणत ममता बॅनर्जींनी नाराजीचा सूर आवळल्याचे समजते. दरम्यान यावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, खासदार तिथे बसले होते. मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. तो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये आहे. आणि मीडिया तेच दाखवत आहे. मात्र त्यात कोणीही काहीही बोलले नाही. याउलट आमच्या १५० खासदारांना निलंबित केले गेले. सभागृहाच्या बाहेर करण्यात आले, त्यावर माध्यमांमध्ये चर्चा नाही. अदानी, राफेल, बेरोजगारी यासारख्या विषयावर चर्चा नाही. आमचे खासदार हतबल होऊन बाहेर बसले आहेत. पण माध्यम नक्कल करण्याची चर्चा करत आहात.
तसेच या प्रकरणावरून काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. भाजप सरकार संविधानाचे पालन करत नाही. ७५ वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्ष मुक्त संसद होत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांना निलंबित करण्यात आले. दिल्लीच्या वेशीवर तीन महिने तीन कृषी कायद्यांसाठी शेतकरी आंदोलन करत होते, यामध्ये ७०० शेतकऱ्यांचा जीव गेला. शेतकऱ्यांच्या मुली ज्यांनी देशासाठी पदके मिळवली त्यांना पोलिसांच्या बळाचा वापर करून मारण्यात आले. तेव्हा शेतकऱ्यांची काळजी कुठे होती, तो शेतकऱ्यांचा अपमान नव्हता का असा खोचक प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, संसदेत झालेल्या घडामोडींमुळे दुःख व्यक्त करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, की आपल्या शेतकरी आणि जाट पार्श्वभूमीला लक्ष केल्यामुळे मी वैयक्तिकरित्या दुखावलो. हा केवळ शेतकरी आणि एका समाजाचा अवमान नाही तर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतींचा अपमान आहे, असेही ते म्हणाले. संसदेतील एक सदस्य राज्यसभा सभापतींची खिल्ली उडवत होते आणि काँग्रेसचे नेते त्याचे चित्रीकरण करत होते. माझ्या हृदयाला यामुळे किती वेदना झाल्या असतील, तुम्ही कल्पना करा, असा प्रश्नही त्यांनी सभागृहात उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांना विचारला. मी व्यक्ती म्हणून माझी अपमान सहन करू शकतो. मात्र देशाचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती म्हणून, शेतकरी समाजाचा घटक म्हणून किंवा जाट समुदायाचा घटक म्हणून हा अपमान मी सहन करणार नाही. मी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊ शकतो. मात्र आपण आपल्या पदाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करू शकलो नाही हे मी कदापि सहन करणार नाही. या सभागृहाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे माझे काम आहे. मात्र, या मुद्द्यावर विरोधकांची शांतता गंभीर आहे. मल्लिकार्जुन खर्गे सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. गेली अनेक दशके आमच्यामध्ये संभाषण होत आहे. मात्र एवढी मोठी घटना झाल्यानंतरही विरोधकांच्या वतीने एक फोन देखील आला नाही.
The post उपराष्ट्रपती जगदीप धनखड अवमान प्रकरण : राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त appeared first on Bharat Live News Media.
Home महत्वाची बातमी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अवमान प्रकरण : राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
उपराष्ट्रपती जगदीप धनखड अवमान प्रकरण : राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली होती. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. या संदर्भातली माहिती एक्सद्वारे स्वतः उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली. तसेच याच प्रकरणावरुन जाट समाजानेही दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयासमोर आणि भाजपच्या महिला खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल …
The post उपराष्ट्रपती जगदीप धनखड अवमान प्रकरण : राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त appeared first on पुढारी.