थंडीच्या दिवसांत स्वेटर चकाचक दिसण्यासाठी या टिप्स जरूर वापरा

पुढारी ऑनलाईन : सध्या गुलाबी थंडीचा सीझन सुरू झाला आहे. गेले सहा महिने कपाटात बंद असलेले गरम कपडे आता वापरण्यासाठी बाहेर येऊ लागले आहेत. पण अनेक दिवसांनी गरम कपडे बाहेर काढल्यावर अनेकदा वास येऊ लागतो किंवा त्यावर गोळे येऊ लागतात. अशा वेळी लोकरीच्या कपड्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी पुढील टिप्स जरूर वापरा. लोकरीचे कपडे धुताना … The post थंडीच्या दिवसांत स्वेटर चकाचक दिसण्यासाठी या टिप्स जरूर वापरा appeared first on पुढारी.

थंडीच्या दिवसांत स्वेटर चकाचक दिसण्यासाठी या टिप्स जरूर वापरा

Bharat Live News Media ऑनलाईन : सध्या गुलाबी थंडीचा सीझन सुरू झाला आहे. गेले सहा महिने कपाटात बंद असलेले गरम कपडे आता वापरण्यासाठी बाहेर येऊ लागले आहेत. पण अनेक दिवसांनी गरम कपडे बाहेर काढल्यावर अनेकदा वास येऊ लागतो किंवा त्यावर गोळे येऊ लागतात. अशा वेळी लोकरीच्या कपड्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी पुढील टिप्स जरूर वापरा.
लोकरीचे कपडे धुताना नेहमीच्या वॉशिंग पावडरचा वापर न करता लोकरीच्या कपड्यांसाठी असलेल्या वेगळ्या पावडरचा उपयोग करावा. या वॉशिंग पावडर इतरांपेक्षा सौम्य असतात. त्यामुळे लोकरीच्या कपड्यांचा पोत आणि मऊपणा टिकून राहतो.
लोकरीच्या कपड्यांवर पडलेले डाग कालांतराने चिवट बनतात. त्यामुळे या कपड्यांवर डाग पडला कि तो जिरण्यापूर्वी लगेच काढण्याचा प्रयत्न करावा. नंतर तो डाग काढताना धागे निघण्याची शक्यता असते. जर घरी डाग काढणं शक्य नसेल तर कपडे ड्रायक्लीनला द्यावेत.
लोकरीच्या कपड्यांवर अनेकदा ते कसे धुवावेत यासंबंधी सूचना दिलेल्या असतात. बऱ्याच लोकरीच्या कपड्यांना ड्रायक्लीन करावं लागतं. त्यामुळे कपडे धुण्यापूर्वी त्यावरच्या सूचना जरूर वाचाव्यात.
लोकरीचे कपडे उन्हात वाळवू नयेत. यामुळे त्यांचा रंग उडण्याची शक्यता असते.
लोकरीचे कपडे घरी धुतले असतील तर ते दोरीवर न सुकवता पसरट पृष्ठभागावर पसरवून वाळवावेत. जेणेकरून त्यांचा आकार बदलणार नाही.
धुतलेले लोकरीचे कपडे पूर्णपणे सुकले आहेत याची खात्री करावी.
कपाटात लोकरीचे कपडे ठेवण्याच्या जागी डांबरगोळ्या ठेवाव्यात म्हणजे त्याला कसर लागत नाही.
 
The post थंडीच्या दिवसांत स्वेटर चकाचक दिसण्यासाठी या टिप्स जरूर वापरा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source