जालना: अंबडजवळील चौधरी पेट्रोल पंपासमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
शहागड, Bharat Live News Media वृत्तसेवा : कार आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना आज (दि.२०) अंबड – जालना महामार्गावरील चौधरी पेट्रोल पंपासमोर घडली. मयूर प्रल्हाद कदम ( मूळ गाव – कवडगाव, सध्या रा. झिरपी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौधरी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून मयूर कदम गावाकडे जात होता. यावेळी त्याच्या (एम .एच 21 .बी 7638) दुचाकीला कारने (एमएच 21 डी.वाय 6643) समोरासमोर धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मयूरला तत्काळ रुग्णवाहिकाने पहिल्यांदा अंबड व नंतर जालना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा
जालना : दुचाकीवरुन येत अज्ञातांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू
जालना : अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या ढाब्यावर तिर्थपुरी पोलिसांचा छापा
जालना जिल्हा बनला आंदोलनाचे केंद्र; मराठा आंदोलनानंतर ओबीसी व ब्राह्मण समाजाचा एल्गार
The post जालना: अंबडजवळील चौधरी पेट्रोल पंपासमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on Bharat Live News Media.