रेशीमबागेतून प्रेरणा, ऊर्जा मिळते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखविली. CM Eknath … The post रेशीमबागेतून प्रेरणा, ऊर्जा मिळते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

रेशीमबागेतून प्रेरणा, ऊर्जा मिळते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखविली. CM Eknath Shinde
आपण लोकांच्या सेवेची प्रेरणा घेऊन येथून जाणार आहोत, आम्हाला काय मिळाले यापेक्षा आम्ही देशाला काय देणार आहोत, हा विचार हेडगेवार यांनी दिला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काल भाजप व शिंदे गट आमदारांनी स्मृती मंदिराला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समर्थक आमदारांनी या बौद्धिक वर्गाला दांडी मारली. आज मुख्यमंत्र्यानी भेट दिली. शिवसेना आमदार भरत गोगावले यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराला ही दुसरी भेट आहे. CM Eknath Shinde
मुख्यमंत्री म्हणाले, नागपुरातील हिवाळी अधिवेशनात रेशीमबागमध्ये भेट देऊन हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत असतो. येथे येण्यात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यात काही राजकारण आहे असे तुम्हाला वाटते का? आमचे हिंदुत्व विकासाचे आहे. सबको साथ लेकर चलना, असे पंतप्रधान मोदी देखील सांगतात. आमचे सरकार हे सामान्य माणसाचे सरकार आहे.
सामान्य माणूस कधी पण मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मी सामान्य माणूस म्हणून काम करतो. म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात, असे शिंदे म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना मविआ सरकारने बंद केल्या होत्या. त्याआम्ही पुन्हा सुरू केल्या. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. सर्व जातीपातीचे लोक एकत्र राहतात. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही आमची भूमिका आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा 

नागपूर : नक्षल पीडित, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Winter Session Nagpur : दानवेंनी आरोप करताच मंगलप्रभात लोढा यांनी खिशातून काढला राजीनामा
Winter Session Nagpur : गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध: एकनाथ खडसेंच्या आरोपाने खळबळ

The post रेशीमबागेतून प्रेरणा, ऊर्जा मिळते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on Bharat Live News Media.

Go to Source