Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Fighter चे नवे पोस्टर रिलीज, शर्टलेस हृतिक रोशन तर दीपिका पादुकोण…
आईच्या गावात मराठीत बोल : ओमी वैद्यच्या धमाकेदार टिजरने वेधलं लक्ष
Swara Bhasker : तीन महिन्यानंतर स्वरा मुलगी ‘राबिया’सोबत पहिल्यांदा आली मुंबईत; फहादने केलं स्वागत
उदाहरणार्थ निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्मिती केली आहे, शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.
अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधून गुप्ते संगीतबद्ध केलं आहे.
फ्रान्स, सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
The post “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा टीजर लाँच appeared first on Bharat Live News Media.