सभागृहात एक बाहेर एक, हा धंदा बंद करा : अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हिवाळी अधिवेशनाच्या आज  शेवटच्या दिवशी विरोधकांनी  विदर्भात अधिवेशन होत असताना न्याय देण्यात अपयशी ठरल्याचे खापर सत्ताधारी पक्षावर फोडले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता. तुम्ही तसा दिला नाही. म्हातारी मेल्याचं दुः ख आहे, पण काळ सोकावतोय. विरोधी पक्षाला विदर्भातच येऊन विदर्भाचा विसर पडला हे बरोबर नाही, असेही … The post सभागृहात एक बाहेर एक, हा धंदा बंद करा : अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला appeared first on पुढारी.

सभागृहात एक बाहेर एक, हा धंदा बंद करा : अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : हिवाळी अधिवेशनाच्या आज  शेवटच्या दिवशी विरोधकांनी  विदर्भात अधिवेशन होत असताना न्याय देण्यात अपयशी ठरल्याचे खापर सत्ताधारी पक्षावर फोडले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता. तुम्ही तसा दिला नाही. म्हातारी मेल्याचं दुः ख आहे, पण काळ सोकावतोय. विरोधी पक्षाला विदर्भातच येऊन विदर्भाचा विसर पडला हे बरोबर नाही, असेही ते म्हणाले. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यातही विधानसभेत खडाजंगी झाल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले.Ajit Pawar On Jayant Patil
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण होते. शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यामुळे जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सभागृह संपले नाही. एक तर दहा दिवसांचे अधिवेशन केले आणि तिकडून दोन प्रस्ताव आणि इकडून एक प्रस्ताव असे हे बरोबर नाही. त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचे अधिवेशन घ्या आणि चर्चा करा. जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुजबुज सुरु होती. त्यावर तुमच्यात आधी ठरवा की कोण आधी बोलायचे ते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. Ajit Pawar On Jayant Patil
अजित पवार म्हणाले, आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोणी बोलायचे ते आम्हाला माहिती आहे. सभागृहात एक आणि बाहेर एक अशी भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा, असा सल्लाही त्यांनी जयंत पाटलांना दिला. दरम्यान, त्यावर बोलताना फडणवीस यांनीही जयंत पाटील यांना चिमटा काढला.
हेही वाचा 

Winter Session Nagpur : दानवेंनी आरोप करताच मंगलप्रभात लोढा यांनी खिशातून काढला राजीनामा
Winter Session Nagpur : दानवेंनी आरोप करताच मंगलप्रभात लोढा यांनी खिशातून काढला राजीनामा
Maharashtra Assembly Winter Session 2023 : ‘राज्यात कधीही दंगली घडू शकतात’; आव्हाड विधानसभेत नेमकं काय म्हणाले…

The post सभागृहात एक बाहेर एक, हा धंदा बंद करा : अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला appeared first on Bharat Live News Media.

Go to Source