पारनेरमध्ये ‘खून का बदला खून’ ; बापाचा मुलाकडून खून

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील चोंभूत येथील चोरमले वस्तीवर सासूच्या डोक्यात दगड घालून जावयाने तिचा खून केला. त्यानंतर पोटच्या मुलाने त्याचा खून करून आजीच्या खुनाचा बदला घेतल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा सुभाष संतोष शेंडगे यास अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे. पती-पत्नीच्या वादातून जावई संतोष दौलत शेंडगे (रा. … The post पारनेरमध्ये ‘खून का बदला खून’ ; बापाचा मुलाकडून खून appeared first on पुढारी.

पारनेरमध्ये ‘खून का बदला खून’ ; बापाचा मुलाकडून खून

पारनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  तालुक्यातील चोंभूत येथील चोरमले वस्तीवर सासूच्या डोक्यात दगड घालून जावयाने तिचा खून केला. त्यानंतर पोटच्या मुलाने त्याचा खून करून आजीच्या खुनाचा बदला घेतल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा सुभाष संतोष शेंडगे यास अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे. पती-पत्नीच्या वादातून जावई संतोष दौलत शेंडगे (रा. शिरसुले, ता.पारनेर) याने सासू राधाबाई महादू चोरमले (रा.चोंभूत,ता.पारनेर) हिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना रविवारी (दि.17) दुपारी चोंभूत येथील चोरमले वस्तीवर घडली होती.
राधाबाई यांचा खून करण्यात आल्याचे नातेवाईकांना कळविण्यात आले. त्यानंतर मेंढ्यांच्या वाड्यावर असलेल्या संतोष शेंडगे व बानुबाई संतोष शेंडगे यांचा मुलगा सुभाष शेंडगे हा देखील तेथे आला. आजी राधाबाईच्या डोक्यात दगड घातल्याने तिचा मृत्यू झालेला असतानाही, संतोष हा शिवीगाळ करीत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या सुभाष याने तेथे असलेल्या लाकडी दांडक्याने वडील संतोष यांच्या डोक्यात मागील बाजूस मारले. त्यामुळे संतोष याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला व तो जागेवरच कोसळला.
पोलिस आल्यानंतर राधाबाई चोरमले व संतोष शेंडगे यांना रुग्णवाहिकेतून पारनेरच्या रुग्णालयात नेण्यात आले तेथे राधाबाई यांना मृत घोषित करण्यात आले. तर, संतोष यास पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्यात आले त्याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर आई बानुबाई संतोष शेंडगे हिच्या फिर्यादीवरून मुलगा सुभाष याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हेही वाचा :

Nashik News : पोलिसाला धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच चोर पळाला
Shubham Dubey: आयपीएलमध्ये रातोरात कोट्यधीश झालेला विदर्भातील शुभम दुबे कोण आहे ?

The post पारनेरमध्ये ‘खून का बदला खून’ ; बापाचा मुलाकडून खून appeared first on Bharat Live News Media.

Go to Source