आयपीएलमुळे नागपूरकर उमेश यादवचेही फळफळले नशीब
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात नागपूरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचे देखील पाच कोटींवर रुपयांची बोली लागल्याने नशीब फळफळले आहे. उमेश कोराडी रोड येथील रहिवासी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशांत वैद्यनंतर उमेश यादव या नागपुरातील खेळाडूचा भारतीय संघात समावेश झाला आहे, हे विशेष. या लिलावात उमेश यादवला विकत घेण्यासाठी अनेक संघांनी बोली लावली, पण गुजरात टायटन्सने बाजी मारली. Umesh Yadav
उमेश यादवला लिलावात मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात घेण्यासाठी खूप धडपड केली, पण शेवटी गुजरातने त्याला 5. 80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सहभागी केले. विशेष म्हणजे नागपूरकर उमेश यादव दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग आहे. यादवने 2010 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून तो दरवर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. उमेश यादवच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 141 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.38 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना 140 डावात 136 विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवने आयपीएलमध्ये 50 डावात फलंदाजी करताना 196 धावा देखील केल्या आहेत. Umesh Yadav
हेही वाचा
IPL Auction 2024 Shubham Dubey | नागपूरच्या पानवाल्याचा मुलगा बनला कोट्यधीश, राजस्थानने मोजले ५.८० कोटी, शुभम दुबेची प्रेरणादायी गोष्ट
Shubham Dubey: आयपीएलमध्ये रातोरात कोट्यधीश झालेला विदर्भातील शुभम दुबे कोण आहे ?
ICC Ranking : आयसीसी रँकींगमध्ये शुबमन गिल, रवी बिश्नोईला मोठे नुकसान
The post आयपीएलमुळे नागपूरकर उमेश यादवचेही फळफळले नशीब appeared first on Bharat Live News Media.