Weather Update : शहरात ढगाळ वातावरण अन् गारठाही वाढला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात गारठा वाढला होता. शहराचे कमाल तापमान 27 अंश इतके खाली आले आहे, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. कमाल तापमान घसरल्याने वातारणात गारठा वाढला आहे. वातावरणात दिवसेंदिवस गारठा वाढत असल्याने नागरिक दिवसभर ऊबदार कपडे घालून वावरत … The post Weather Update : शहरात ढगाळ वातावरण अन् गारठाही वाढला appeared first on पुढारी.

Weather Update : शहरात ढगाळ वातावरण अन् गारठाही वाढला

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात गारठा वाढला होता. शहराचे कमाल तापमान 27 अंश इतके खाली आले आहे, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. कमाल तापमान घसरल्याने वातारणात गारठा वाढला आहे.
वातावरणात दिवसेंदिवस गारठा वाढत असल्याने नागरिक दिवसभर ऊबदार कपडे घालून वावरत आहेत. तसेच दुकानांमध्येदेखील ऊबदार कपडे खरेदीला वेग आला आहे. पहाटे कामावर जाणार्‍या कर्मचार्‍यांना तर चांगलीच थंडी जाणवत आहे. शहरातील चहा व वडापावच्या टपर्‍यांवर गरमागरम वडापाव व चहाचा आस्वाद घेणार्‍यांची गर्दी वाढत आहे. चहा आणि कॉफी विक्रेत्यांच्या दुकानावर दिवसभर नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसत आहे.
हेही वाचा

Pimpri Crime News : परस्पर कर्ज काढणार्‍या ठगाला केली अटक
Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा
अशीही एक गोष्ट : दुपारी परीक्षा अन् संध्याकाळी लग्नाची बेडी

The post Weather Update : शहरात ढगाळ वातावरण अन् गारठाही वाढला appeared first on Bharat Live News Media.

Go to Source