कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ ची दुसऱ्यांदा बदलली रिलीज डेट; ‘या’ दिवशी येणार भेटीला

कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ ची दुसऱ्यांदा बदलली रिलीज डेट; ‘या’ दिवशी येणार भेटीला


पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि साऊथ स्टार विजय सेतुपती यांच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ ( Merry Christmas ) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरने वाट पाहत आहेत. मात्र, पुन्हा एकादा चाहत्यांची निराशा पदरात पडली आहे, कारण ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाची दुसऱ्यांदा पुन्हा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट यावर्षी नाही तर नवीन वर्षात म्हबणजे, २०२४ साली प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या 

Khurchi Movie : ‘कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला’; राकेश बापटची एन्ट्री
Anushka Sharma : विषय हार्ड भावा! अनुष्काला पाहून विराटने फ्लाईंग किसचा पाडला पाऊस
Tiger ३ च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण

मराठी अभिनेत्री राधिका आपटेने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटातील एक फोटो शेअर करून चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आल्याची माहिती दिली आहे. या फोटोत रेस्टॉरंटमधील एका टेबलाजवळच्या खुर्चीवर कॅटरिना शांत बसलेली दिसतेय. तर विजय सेतुपती तिच्याकडे एकटक पाहताना आणि काहीतरी विचार करताना दिसतोय.
राधिकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आता तुझी प्रतीक्षा अखेर संपली आहे. तुमचा हिवाळा आणखीनच चांगला होणार आहे. आगामी ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.’ यावरून कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलल्याची अधिकृत्त माहिती समोर आली आहे. यापूर्वी ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार होता. यानंतर, त्याची तारीख एक आठवडा आधी म्हणजेच ८ डिसेंबर बदलण्यात आली होती. यावरून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दुसऱ्यांदा बदलण्यात आली आहे.
तर दुसरीकडे कॅटरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ ( Merry Christmas ) हा चित्रपट यापूर्वी १५ डिसेंबरला बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी ‘योधा’ चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार होता. दोन्ही चित्रपट एकमेंकाना टक्कर देण्यास सज्ज झाले होते. दरम्यान ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट फ्लॉफ होईल किंवा ‘योधा’ चित्रपटासमोरव फारसा टिकाव लागणार नाही, या भितीने निर्मात्यांनी त्यांची रिलीज डेट बदलून १५ डिसेंबर ऐवजी याआधी ८ डिसेंबर करण्यात आली होती. दरम्यान चित्रपटाची रिलीज डेट बदलून आता ८ डिसेंबर ऐवजी १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर ‘योद्धा’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात येवून हा चित्रपट पुढील वर्षीच्या मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Radhika (@radhikaofficial)

The post कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ ची दुसऱ्यांदा बदलली रिलीज डेट; ‘या’ दिवशी येणार भेटीला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि साऊथ स्टार विजय सेतुपती यांच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ ( Merry Christmas ) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरने वाट पाहत आहेत. मात्र, पुन्हा एकादा चाहत्यांची निराशा पदरात पडली आहे, कारण ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाची दुसऱ्यांदा पुन्हा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट यावर्षी नाही तर …

The post कॅटरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ ची दुसऱ्यांदा बदलली रिलीज डेट; ‘या’ दिवशी येणार भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source