पन्नून हत्या कटाचा अमेरिकच्‍या आरोपावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्‍हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याला ठार मारण्याचा भारताने कट रचल्याच्या आरोप काही दिवसांपूर्व अमेरिकेने केला होता. या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटनमधील ‘द फायनान्शिअल टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटले आहे की, काही घटनामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधामध्‍ये बिघाड होणार नाही. … The post पन्नून हत्या कटाचा अमेरिकच्‍या आरोपावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्‍हणाले… appeared first on पुढारी.

पन्नून हत्या कटाचा अमेरिकच्‍या आरोपावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्‍हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याला ठार मारण्याचा भारताने कट रचल्याच्या आरोप काही दिवसांपूर्व अमेरिकेने केला होता. या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रिटनमधील ‘द फायनान्शिअल टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटले आहे की, काही घटनामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधामध्‍ये बिघाड होणार नाही. काही जण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धमकावण्यात गुंतले आहेत आणि हिंसाचाराला चिथावणी देत आहेत, असा स्‍पष्‍ट करत परदेशातील दहशतवादी गटांच्या कारवायांबद्दल त्‍यांनी तीव्र चिंता केली आहे.
दहशतवादी आणि बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचा प्रमुख असलेल्या पन्नूनला ठार मारण्याच्या कथित कटात सामील असल्याचा आरोप अमेरिकेतील न्याय विभागाने केला होता.
सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य हे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे महत्त्वाचे घटक असल्याचेही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. मला वाटत नाही की काही घटनांना दोन देशांमधील राजनैतिक संबंधांशी जोडणे योग्य आहे,” असेही मोदी यांनी
स्‍पष्‍ट केले. भारत आणि अमेरिकेत मजबूत द्विपक्षीय समर्थन आहे, जे परिपक्व आणि स्थिर भागीदारीचे स्पष्ट सूचक आहे,” असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

The post पन्नून हत्या कटाचा अमेरिकच्‍या आरोपावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्‍हणाले… appeared first on Bharat Live News Media.

Go to Source