धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील सहाजणांना कारने चिरडले
अमरावती, Bharat Live News Media ऑनलाईन : एकाच कुटुंबातील सहाजणांना कारने चिरडल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली आहे. यात तिघे ठार झाले आहेत. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Amravati News)
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पीडित कुटुंबातील मंडळी घराच्या व्हरांड्यात बसली होती. याचवेळी संशयित आरोपी चारचारी गाडी घेऊन तेथे आला आणि त्याने कुटुंबियाच्या अंगावर गाडी घातली. कारच्या भीषण धडकेत कुटुंबातील सहाजण गंभीर जखमी झाले. त्यांना दरियापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये अनुसया अंभोरे (वय ६७), शामराव अंभोरे (वय ७०), अनारकली गुजर (वय ४३) यांचा समावेश आहे. तर अन्य तिघांना अमरावती येथील इर्विन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. शारदा अंभोरे (वय ४०) उमेश अंभोरे (वय ४०) आणि किशोर अंभोरे (वय ३८) अशी जखमींची नावे आहेत. (Amravati News)
ज्याने हे कृत्य केले आहे त्या आरोपीचा पीडित कुटुंबियांशी जुना वाद होता. सदर आरोपी हा गावात बेकायदेशीरपणे दारु विक्री करतो. चंदन गुजर असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने दर्यापूर तालुका हादरला आहे.
हे ही वाचा :
Yawatmal News : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नी सासऱ्यासह दोन मेहुण्यांची हत्या
Nashik Bribe News : ‘त्या’ लाचखोर ग्रामसेवकाला एक वर्ष कारावास
Jalgaon Crime : पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून
The post धक्कादायक! पूर्ववैमनस्यातून एकाच कुटुंबातील सहाजणांना कारने चिरडले appeared first on Bharat Live News Media.