पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांची शतकी खेळी आणि त्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारताने फायनलमध्ये धडक मारली. या विजयानंतर टीम इंडियाने ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या सेलिब्रेशनचा (Team india celebration) व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे.
यापूर्वी टीम इंडियाने १९८३, २००३ आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचज्ञक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. आता तब्बल एका तपानंतर भारताने अंतिम सामन्यात आपलं स्थान निश्चित केले आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विजयानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारून एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत.
Raw emotions & pure joy post a special win at Wankhede 🏟️
Thank you to all the fans for the unwavering support 💙
WATCH 🎥🔽 – By @28anand#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ | @yuzi_chahal https://t.co/8fhKUtO1Ae
— BCCI (@BCCI) November 16, 2023
सामन्यातील विजयानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष करताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा आणि अनेक खेळाडूंनी विराट कोहलीला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी, आर अश्विन शमीच्या हाताचा किस घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच स्टेडियममध्ये हजेरी लावत भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिल्यानंतर युझवेंद्र चहलही ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहे. चहलने बुमराह आणि कोहलीला मिठी मारली. या व्हिडिओच्या शेवटी चाहते रोहित-रोहितच्या घोषणाही देताना दिसते.
The post फायनलमध्ये ‘धडक’! टीम इंडियाने असं केलं सेलिब्रेशन (व्हिडिओ) appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांची शतकी खेळी आणि त्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारताने फायनलमध्ये धडक मारली. या विजयानंतर टीम इंडियाने ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या सेलिब्रेशनचा (Team india celebration) …
The post फायनलमध्ये ‘धडक’! टीम इंडियाने असं केलं सेलिब्रेशन (व्हिडिओ) appeared first on पुढारी.