दुचाकी चोरी करून घरफोड्या; दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुचाकींची चोरी करून घरफोड्या करणार्‍या दोघा चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी आणि रोकड असा 13 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पीयुष गणेश भरम (वय 22, रा. आंबेगाव पठार), विवेक उत्तम मोरे (वय 24, रा. पवारनगर, गुजरवाडी) अशी चोरट्यांची नावे आहेत. स्वारगेट परिसरातील एका व्यक्तीची … The post दुचाकी चोरी करून घरफोड्या; दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक appeared first on पुढारी.

दुचाकी चोरी करून घरफोड्या; दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दुचाकींची चोरी करून घरफोड्या करणार्‍या दोघा चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी आणि रोकड असा 13 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पीयुष गणेश भरम (वय 22, रा. आंबेगाव पठार), विवेक उत्तम मोरे (वय 24, रा. पवारनगर, गुजरवाडी) अशी चोरट्यांची नावे आहेत.
स्वारगेट परिसरातील एका व्यक्तीची दुचाकी पार्किंगमधून चोरट्यांनी चोरी केली. याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत असताना, पोलिस कर्मचारी शिवदत्त गायकवाड, अनिस शेख आणि रमेश चव्हाण माहिती मिळाली होती की, चोरी गेलेली दुचाकी स्वारगेट कॅनॉलजवळ चहाच्या गाडीजवळ थांबली आहे. त्या दुचाकीवर आरोपी पीयुष आणि विवेक बसल्याचे दिसून आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, संदीप घुले, सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने केली.
चोरट्यांकडून पाच लाखांचे 29 मोबाईल जप्त
बॅटरी आणि मोबाईल चोरी करणार्‍या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून बॅटरी, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तब्बल 29 मोबाईल असा 4 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्ञानेश्वर शशिकांत रामटेके (वय 21) असे त्याचे नाव असून, एका अल्पवयीन साथीदारासोबत त्याने या चोर्‍या केल्या आहेत. पोलिस कर्मचारी संदीप घुले, दीपक खेंदाड आणि फिरोज शेख यांना या चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळा
The post दुचाकी चोरी करून घरफोड्या; दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source