मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक, निफ्टी २१,५५० पार
Bharat Live News Media ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील तेजीची घौडदौड कायम आहे. आज बुधवारी मजबूत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ४०० अंकांनी वाढून ७१,८४० चा टप्पा पार केला. सेन्सेक्सचा हा नवा विक्रमी उच्चांक आहे. तर निफ्टी ११३ अंकांनी वाढून २१,५६६ वर पोहोचला. शेअर बाजारातील विक्रमी तेजीत आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. (Sensex hit Fresh record)
सेन्सेक्सवर टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स आहेत. तर एम अँड एम, सन फार्मा या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
चीननंतर जपानच्या मध्यवर्ती बँकेनेही व्याजदरात कोणताही बदल केला नाही. यामुळे आशियाई बाजारात तेजीचा माहौल आहे. याचा मागोवा घेत भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी बुधवारी नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार सुरु केला.
The post मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक, निफ्टी २१,५५० पार appeared first on Bharat Live News Media.