IPL Auction 2024 : भविष्यातील स्टार्कला गुजरातने दिले 10 कोटी
दुबई, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीग 2024 (IPL Auction 2024) साठी सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वाधिक डिमांड पाहायला मिळतेय. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. त्यात स्पेन्सर जॉन्सनला 10 कोटी रुपयांत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. जॉन्सनला ऑस्ट्रेलियात भविष्याचा मिचेल स्टार्क म्हटले जाते.
ऑस्ट्रेलियाच्या लेफ्ट आर्म जलदगती गोलंदाज जॉन्सनची मूळ किंमत 50 लाख होती. गुजरात टायटन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांनी त्याच्यासाठी बोली लावली. 85 लाखांपर्यंत बोली आल्यावर दिल्ली कॅपिटल्सने उडी घेतली. जॉन्सनची किंमत 2 कोटीपर्यंत गेली. गुजरात व दिल्ली यांच्यातील चुरशीमुळे ती 6 कोटींच्या घरात गेली. दोन्ही संघांना काही करून तो आपल्याकडे हवा होता. परंतु, गुजरातने 10 कोटी बोली लावून ऑसी गोलंदाजाला आपलेसे केले. (IPL Auction 2024)
‘दी हंड्रेड लीग’ गाजवणार्या स्पेन्सर जॉन्ससने आपल्या भेदक मार्याने अनेकांना हतबल करून सोडले आहे. ‘दी हंड्रेड लीग’मध्ये पदार्पण करताना त्याने 20 चेंडूंत 3 विकेटस् घेतल्या आणि तेही केवळ 1 धाव देऊन. ओव्हर इन्व्हिजिबल संघाकडून खेळणार्या जॉन्सनने मँचेस्टर ओरिजिनल्सला धक्का दिला. त्याने 19 चेंडू निर्धाव फेकले.
The post IPL Auction 2024 : भविष्यातील स्टार्कला गुजरातने दिले 10 कोटी appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या IPL Auction 2024 : भविष्यातील स्टार्कला गुजरातने दिले 10 कोटी
IPL Auction 2024 : भविष्यातील स्टार्कला गुजरातने दिले 10 कोटी
दुबई, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीग 2024 (IPL Auction 2024) साठी सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सर्वाधिक डिमांड पाहायला मिळतेय. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. त्यात स्पेन्सर जॉन्सनला 10 कोटी रुपयांत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. जॉन्सनला ऑस्ट्रेलियात भविष्याचा मिचेल स्टार्क म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाच्या लेफ्ट आर्म …
The post IPL Auction 2024 : भविष्यातील स्टार्कला गुजरातने दिले 10 कोटी appeared first on पुढारी.