जानेवारी-फेब्रुुवारीमध्ये ’परीक्षा पे चर्चा’; 12 जानेवारीपर्यंत करा नोंदणी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम ’परीक्षा पे चर्चा’ तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची 12 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.
गोसावी म्हणाले, ’परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होणार्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी, 12 डिसेंबरपासून https:// innovateindia.mygov.in/ppc ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा आयोजित केली जात आहे. 12 डिसेंबर, 2023 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणार्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लींक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
जिल्ह्यातील इयत्ता 6 वी ते 12 वी मधील सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुका तसेच जिल्हा स्तरावरील सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत सर्व कर्मचा-यांना संबंधित क्षेत्रातील मोठ्या पटांच्या शाळांमधून ’परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाकरिता नोंदणी करण्यासाठी शाळा नेमून देण्यात याव्यात. ’परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षकांबरोबर पालकदेखील आपला सहभाग देऊ शकतात याकरिता, संबंधित शाळांनी पालकांशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाहन करावे.
जेणेकरून अधिकाधिक पालक सहभागी होऊ शकतील. नियमितपणे जिल्हास्तरावरून दैनंदिन सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी माहिती संकलित करून संचालनालयास सादर करावी. शाळांनाही त्यांच्या संकेतस्थळावर ’परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाशीसंबंधित प्रसिध्दी देण्याकरिता सूचना देण्यात याव्यात. प्रस्तुत उपक्रमाकरिता नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे काम पाहतील. क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेऊन ’परीक्षा पे चर्चा’ उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदविला जाईल, याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
पात्र ठरवूनही दहा हजार शाळा अनुदानापासून वंचित
घाण करणार्यांच्या विरोधात महापालिकेची मोहीम; 72 लाखांचा दंड वसूल
The post जानेवारी-फेब्रुुवारीमध्ये ’परीक्षा पे चर्चा’; 12 जानेवारीपर्यंत करा नोंदणी appeared first on Bharat Live News Media.