वर्षभरात तूरडाळ 40 टक्क्यांंनी महागली; आता 20 रुपयांनी स्वस्त
छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात तूरडाळीच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसघशीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलो डाळीचे भाव 170 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मूग, चणाडाळी महागल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळी गायब झाल्या होत्या. मात्र, आता नवीन माल येणार असल्याने तूरडाळ 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मूगडाळ 10 रुपयांनी उतरली असून, चणा, उडीद आणि मसूरडाळीचे दर स्थिर असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
तूरडाळीच्या दरात सातत्याने वाढ सुरू असल्याने किरकोळ बाजारात प्रतिकिलो दर 200 रुपयांवर जाण्याचे चित्र होते. त्यामुळे तूरडाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करत थेट शेतकर्यांकडून खरेदीचा आणि डाळी आयात करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
तूर, मूगडाळ स्वस्त
या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत डाळींचे भाव तेजीत होते. मात्र, नवीन मालाची आवक होणार असल्याने तूरडाळ 20 रुपयांनी स्वस्त होऊन 150 रुपये, मूगडाळ 108 रुपये तर, चणाडाळ 70 रुपये किलोवरआली. मसूर, उडीदडाळीचे दर स्थिर आहेत.
दराची चढ-उतरण…
* अपेक्षित पाऊस न झाल्याने जुलैमध्ये तूरडाळीचे दर 140 रुपये किलोवर
* ऑक्टोबरमध्ये तूरडाळ 162 ते 170 रुपयांपर्यंत महागली
* किरकोळ बाजारात 180 ते 190 रुपये किलो दराने विक्री
* मूगडाळ घाऊक बाजारात 116 रुपये किलो दराने विक्री
* नोव्हेंबर अखेरपर्यंत तेजी
* मध्यंतरी पाऊस आणि आता नवीन मालाच्या आवकेमुळे बाजार पडला
The post वर्षभरात तूरडाळ 40 टक्क्यांंनी महागली; आता 20 रुपयांनी स्वस्त appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या वर्षभरात तूरडाळ 40 टक्क्यांंनी महागली; आता 20 रुपयांनी स्वस्त
वर्षभरात तूरडाळ 40 टक्क्यांंनी महागली; आता 20 रुपयांनी स्वस्त
छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात तूरडाळीच्या दरात तब्बल 40 टक्क्यांची घसघशीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात प्रतिकिलो डाळीचे भाव 170 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मूग, चणाडाळी महागल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळी गायब झाल्या होत्या. मात्र, आता नवीन माल येणार असल्याने तूरडाळ 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मूगडाळ 10 रुपयांनी उतरली असून, चणा, उडीद आणि मसूरडाळीचे दर स्थिर असल्याचे व्यापार्यांनी …
The post वर्षभरात तूरडाळ 40 टक्क्यांंनी महागली; आता 20 रुपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.