आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ विषयावर चर्चा व्हावी खा. सुप्रिया सुळे

आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ विषयावर चर्चा व्हावी खा. सुप्रिया सुळे


पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ हा विषय चर्चेसाठी मांडावा. तसेच यासाठी वेळ द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली आहे. या मागणी संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (Supriya Sule on Reservation)
सुप्रिया सुळे यांनी आपल्‍या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनदेखील या समाजघटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. परिणामी या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. या प्रश्नावरून अनेक तरुणांनी आपलं जीवन संपवले आहे.  ही मोठी त्रासदायक परिस्थिती आहे. आरक्षणाचे हे विषय सभागृहात मांडले जाऊन ते मंजूर होणे आवश्यक आहे. म्हणून लोकसभा अध्यक्षांनी आगामी अधिवेशनात आरक्षणाचा विषय मांडून त्यावर चर्चा करावी, अशी विनंती खासदार सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. (Supriya Sule on Reservation)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा व धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधव आंदोलन करीत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनसुद्धा या समाजघटकांचे आरक्षणाचे…
— Supriya Sule (@supriya_sule) November 16, 2023

हेही वाचा:

Marath Reservation : मनोज जरांगे पाटलांच राज ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर
MNS Raj Thackeray : मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही : राज ठाकरे
Vijay Wadettiwar : निवडणूक आयोग खिशात घालून फिरताहेत भाजप नेते : विजय वडेट्टीवार

The post आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ विषयावर चर्चा व्हावी खा. सुप्रिया सुळे appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ हा विषय चर्चेसाठी मांडावा. तसेच यासाठी वेळ द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली आहे. या मागणी संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (Supriya Sule on Reservation) सुप्रिया सुळे …

The post आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ विषयावर चर्चा व्हावी खा. सुप्रिया सुळे appeared first on पुढारी.

Go to Source