बेळगाव : बेकिनकेरेत भरदिवसा घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास
बेळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे मंगळवारी भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. नामदेव भोगण यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दोन तोळ्याचे सोच्याचे कुडे- झुबे, पंधरा तोळ्याची चांदीची साखळी, सहा तोळ्याचे चांदीचे वाळे लंपास केले. तसेच ट्रंक फोडून तीस हजार रुपयेही लांबविले.
नामदेव यांची पत्नी व मुलगी परगावी गेले आहेत तर नामदेव व त्यांचा मुलगा कामानिमित्त सकाळी नऊलाच घराबाहेर पडला होता. दुपारी एक वाजता नितीन घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. सदर घटनेची नाेंंद रात्री उशिरापर्यंत काकती पोलिसांत नोंद झाली नव्हती. सीमेवरील काही गावांमधून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :
मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषीत : ८ हजारहून अधिक गावांना ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी
जळगाव : विटनेर येथे टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार
ठाण्यात ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू
The post बेळगाव : बेकिनकेरेत भरदिवसा घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास appeared first on Bharat Live News Media.