मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषीत : ८ हजारहून अधिक गावांना ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली आहे. यात मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावात एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. याबाबतची अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी घोषीत करण्यात आली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १ हजार ६५२ गावांचा तसेच बीड १ हजार ३९७ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ३५६ गावांचा समावेश आहे.
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये पेरण्या देखील लांबल्या. जुलै महिन्यात झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. विभागातील एकूण ५६ लाख १५ हजार १०.६५ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. मात्र, लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी ५० लाख ९७ हजार ६०६.६२ हेक्टरवर पेरणी झाली. तर ४ लाख ७९ हजार ८६६.६१ क्षेत्र पडीक राहिले आहे. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा बराच काळ खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. मात्र, उर्वरीत सहा जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला. अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे उत्पन्नात घट झाली आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे ३१ आॅक्टोबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारीत आणेवारी जाहीर करण्यात आली होती. या आणेवारीनंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी घोषीत करण्यात आली आहे.
अंतिम आणेवारी घोषीत झालेल्या जिल्हयातील गावांची आकडेवारी
एकूण ८ हजार ४९६ :
छत्रपती संभाजीनगर १ हजार ३५६
धाराशिव ७१९
बीड १ हजार ३९७
परभणी ८३२
नांदेड १ हजार ५६२
जालना ९७१
लातूर ९५२
हिंगोली ७०७
The post मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषीत : ८ हजारहून अधिक गावांना ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषीत : ८ हजारहून अधिक गावांना ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी
मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषीत : ८ हजारहून अधिक गावांना ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली आहे. यात मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावात एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. याबाबतची अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी घोषीत करण्यात आली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक …
The post मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषीत : ८ हजारहून अधिक गावांना ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी appeared first on पुढारी.