IND vs SA : भारताला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA ODI : भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केबेरा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. द. आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजीस आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 4 धावांवर ऋतुराज गायकवाड बाद झाला. सध्या … The post IND vs SA : भारताला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद appeared first on पुढारी.

IND vs SA : भारताला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IND vs SA ODI : भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केबेरा येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. द. आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजीस आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 4 धावांवर ऋतुराज गायकवाड बाद झाला. सध्या टीम इंडियाची धावसंख्या 3 षटकांत 1 बाद 6 आहे.
भारताला पहिला धक्का
ऋतुराज गायकवाडच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. त्याला नांद्रे बर्जरने एलबीडब्ल्यू केले. ऋतुराजने दोन चेंडूत चार धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या 4 होती.
या सामन्यातून भारताचा रिंकू सिंहने वनडेत पदार्पण केले आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने त्याला पदार्पणाची कॅप दिली.तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला.
भारतीय संघ
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका संघ
टोनी डी जोर्जी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.
भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी द. आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्याची सुरुवात टी-20 मालिकेने झाली. ती मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.
भारत द. आफ्रिकेत दुसरी मालिका जिंकू शकतो
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत 6 वनडे मालिका खेळल्या आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेने 5 मालिका जिंकल्या असून भारताला फक्त एक मालिका जिंकता आली आहे. जर भारताने आजचा सामना जिंकला तर तो मालिका जिंकेल आणि यजमानांच्या घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा मालिकेचे विजेतेपद मिळवेल. टीम इंडियाने 2018 च्या दौऱ्यावर येथे शेवटची मालिका जिंकली होती. त्यावेळी भारताने 6 वनडे सामन्यांच्या मालिकेत 5-1 ने विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिका आघाडीवर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 16 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी भारताने 7 आणि दक्षिण आफ्रिकेने 6 जिंकले. 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये एकूण 92 एकदिवसीय सामने खेळले गेले. दक्षिण आफ्रिकेने 50 तर भारताने 39 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही.
The post IND vs SA : भारताला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद appeared first on Bharat Live News Media.

Go to Source