ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे, पारुंडे, काले, तांबे, शिंदे राळेगण भागामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व धुके असल्यामुळे आंब्याच्या झाडाला आलेला बहार गळू लागला आहे. तसेच आंब्यावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हापूस, तोतापुरी, लंगडा, पायरी, बाटली, दशेरी, रत्ना हापूस अशा विविध जातीच्या आंब्याची … The post ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका appeared first on पुढारी.

ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे, पारुंडे, काले, तांबे, शिंदे राळेगण भागामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व धुके असल्यामुळे आंब्याच्या झाडाला आलेला बहार गळू लागला आहे. तसेच आंब्यावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हापूस, तोतापुरी, लंगडा, पायरी, बाटली, दशेरी, रत्ना हापूस अशा विविध जातीच्या आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यंदा आंब्यांना बहार मोठ्या प्रमाणात आला आहे. परंतु, ढगाळ आणि दूषित वातावरणामुळे आंब्याचा बहार गळू लागला आहे.
मध्यंतरी झालेल्या पावसाचा फटकादेखील या बहाराला बसला आहे. या दूषित वातावरणामुळे आंब्याच्या बहाराला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगट हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असून, आता औषध फवारणी करावी लागणार आहे . येणारे येथील शेतकरी जयसिंग घोगरे म्हणाले, सध्या काही आंब्यांना मोहर आला आहे व काही आंब्यांना मोहर येत आहे. ढगाळ व दूषित हवामानामुळे या मोहरावर पाणी साचते व मोहर गळतो, तसेच पाणीच असल्यामुळे करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. सध्याच्या या दूषित वातावरणाचा आंब्याच्या उत्पादनाला 25 टक्के फटका बसू शकतो, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :

मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत, आ. राहुल ढिकलेंकडून औचित्याचा मुद्दा
Alandi : माऊलींचा थकवा दूर करण्यासाठी भाविकांकडून प्रशाळपूजा

The post ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका appeared first on Bharat Live News Media.

Go to Source