वेस्ट इंडिजच्या ‘या’ गोलंदाजासाठी RCB ने मोजले 11.50 कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये सुरू झाला. आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांच्या भाषणाने लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. यानंतर मल्लिका सागर यांनी लिलावाची जबाबदारी घेतली. पहिली बोली वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलवर लावण्यात आली. त्याला राजस्थान रॉयल्सने 7 कोटी … The post वेस्ट इंडिजच्या ‘या’ गोलंदाजासाठी RCB ने मोजले 11.50 कोटी appeared first on पुढारी.

वेस्ट इंडिजच्या ‘या’ गोलंदाजासाठी RCB ने मोजले 11.50 कोटी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये सुरू झाला. आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांच्या भाषणाने लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. यानंतर मल्लिका सागर यांनी लिलावाची जबाबदारी घेतली. पहिली बोली वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलवर लावण्यात आली. त्याला राजस्थान रॉयल्सने 7 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना खरेदी केले.
बीसीसीआयच्या प्रेस रिलीझनुसार, आयपीएल मिनी लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी त्यांची नावे नोंदवली होती, त्यापैकी 333 नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. त्यात 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश होता. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले 116 खेळाडू, तर 215 खेळाडू अनकॅप्ड आहेत. दोन खेळाडू सहयोगी देशांचेही आहेत. या लिलावाद्वारे 10 संघात एकूण 77 खेळाडू घेतले जाणार आहेत. (IPL 2024 Auction)
अल्झारी जोसेफसाठी आरसीबीने मोजले 11.50 कोटी
लिलावात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. गेल्या मोसमात तो गुजरात टायटन्सकडून (जीटी) खेळताना दिसला होता. गेल्या काही वर्षांत त्याने वेस्ट इंडिजकडून खेळताना छाप पाडली आहे. जोसेफने IPL 2023 मध्ये 7 सामने खेळले. यादरम्यान त्याने 32.14 च्या सरासरीने आणि 9.38 च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट घेतल्या. अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभूत होऊन त्याचा संघ उपविजेता ठरला होता. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 19 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 28.80 च्या सरासरीने आणि 9.19 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट घेतल्या आहेत. 2019 मध्ये तो पहिल्यांदा या लीगमध्ये खेळताना दिसला होता.
कमिन्ससाठी बेंगळुरू-हैदराबाद भिडले
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बोली युद्ध झाले. मुंबईने पहिला कमिन्सवर त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपयांपासून बोली लावण्यास सुरुवात केली. त्यांनी 5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. येथून बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये बोली युद्ध झाले. दोन्ही संघांना कर्णधाराची गरज आहे. चेन्नईने 10 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. बेंगळुरू आणि हैदराबादने 20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. अखेर हैदराबादने त्याला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
पंजाब-चेन्नईमध्ये मिशेलसाठी बोली युद्ध
न्यूझीलंडचा अष्टपैलू फलंदाज डॅरिल मिशेलसाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बोली युद्ध रंगले. दोन्ही संघांनी 12 ते 13.75 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. अखेरीस चेन्नईने अचानक एन्ट्री घेत मिशेलला 14 कोटींना विकत घेतले.
हर्षल पटेल महागडा भारतीय खेळाडू
स्लोअर बॉल स्पेशालिस्ट हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बोली लढत झाली. गुजरातने 10.75 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, त्यानंतर लखनौ सुपरजायंट्सने त्यात भाग घेतला. पंजाबने शेवटपर्यंत टिकून राहत हर्षलला 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र अवघ्या 1.80 कोटी रुपयांना विकला गेला. श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा 1.50 कोटी रुपयांत हैदराबादचा भाग झाला.
The post वेस्ट इंडिजच्या ‘या’ गोलंदाजासाठी RCB ने मोजले 11.50 कोटी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source