यवतमाळ : गोधनी मार्गावर पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून
यवतमाळ : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील गोधनी मार्गावर असलेल्या आदिवासी सोसायटी येथे सोमवारी सायंकाळी रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती आढळून आली होती. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खून झाल्याच्या घटनेला वाचा फुटली. अवधूतवाडी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर भरवस्तीत घडलेला हा प्रकार उघडीस आला.
प्रेमदास वाल्मीक पवार (वय ४८) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर पाच संशयितांनी चाकूचे घाव घातले. नंतर दगडाने प्रहार केला. यातच प्रेमदासचा जागेवर मृत्यू झाला. हा प्रकार बराच वेळ निदर्शनास आला नाही. नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमदासचे फोटो व्हायरल झाले. त्यावरून अवधूतवाडी पोलिस घटनास्थळी पोहोचले.
आदिवासी सोसायटी परिसरातच प्रेमदास पवार याचे वास्तव्य होते. त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रेमदासचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी हंबरडा फोडला. नंतर तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिसांनी हा जमाव बाजूला करीत प्रेमदासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. हा खून नेमका कशातून झाला, संशयित कोण याबाबत जमलेल्या गर्दीमध्ये चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी तर ही घटना घडली नाही ना असाही संशय वर्तविला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
हेही वाचा
यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना
Yavatmal News : ट्रकवर दुचाकी आदळली; एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २ तरुणांचा मृत्यू
यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास
The post यवतमाळ : गोधनी मार्गावर पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून appeared first on Bharat Live News Media.