यवतमाळ: ट्रकवर दुचाकी आदळली; एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २ तरुणांचा मृत्यू

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : पांढरकवडावरून आदिलाबादकडे निघालेली दुचाकी टोल नाक्यावर उभ्या ट्रकवर मागून धडकली. या भीषण अपघातात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. दोन्ही मृत तरुण तेलंगणातील असून ते अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. Yavatmal News आदिलाबाद येथील आरआयएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी तीन दुचाकीने … The post यवतमाळ: ट्रकवर दुचाकी आदळली; एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २ तरुणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

यवतमाळ: ट्रकवर दुचाकी आदळली; एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २ तरुणांचा मृत्यू

यवतमाळ : Bharat Live News Media वृत्तसेवा : पांढरकवडावरून आदिलाबादकडे निघालेली दुचाकी टोल नाक्यावर उभ्या ट्रकवर मागून धडकली. या भीषण अपघातात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. दोन्ही मृत तरुण तेलंगणातील असून ते अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. Yavatmal News
आदिलाबाद येथील आरआयएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी तीन दुचाकीने पांढरकवडावरून आदिलाबादकडे जात होते. पहाटेच्या सुमारास पांढरकवडा टोल नाक्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात कोगिल्ला डेव्हिडराज प्रेमदास (वय २१, रा. परकाल मडल वरंगल, तेलंगणा), बालासाई चीप्पेला (वय २१, रा. विजयवाडा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पांढरकवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रात्री दोघांचेही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवले. Yavatmal News
या घटनेची माहिती मिळताच, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन जयसिंग राठोड, श्यामा प्रसाद व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी घटनास्थळी धावले. मृत विद्यार्थी कोगिल्ला हा तेलंगणातील वरंगल जिल्ह्यातील परकाल येथील रहिवासी होता. तर बालसाई हा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी होता. दोघेही एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत होते. अपघाताचे वृत्त समजताच आदिलाबादचे आमदार पायल शंकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पांढरकवडा येथे घटनास्थळकडे धावले. येथील शासकीय रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. तसेच दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेने आंध्रप्रदेशला पाठविण्यात आले. अपघाताच्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा 

यवतमाळ : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; किन्ही येथील उड्डाणपुलावरील घटना
यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास
यवतमाळ: पांढरकवडा बाजार समितीच्या गोदामात आढळली सुगंधी तंबाखूची १२ पोती

The post यवतमाळ: ट्रकवर दुचाकी आदळली; एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २ तरुणांचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source