छवी मित्तलच्या केसांना आग लागताच करण जोहरनं वाचवला जीव
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल ( Chhavi Mittal ) तिच्या वैवाहिक जीवनातील अपडेट शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. कधी ती तिचे हॉट लूक तर कधी तिच्या हेल्थ अपडेटस देत असते. आता तिच्या आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ माजली आहे. नुकतेच शूटिंगच्या सेटवर छवी मित्तलच्या केसांना आग लागली आहे. यानंतर निर्माता करण जोहरने वेळीच प्रसंगावधान राखत आग विझविली आहे. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या
Hanuman trailer : सर्वात बलशाली…; साऊथ स्टार तेजा सज्जाच्या ‘हनुमान’चा ट्रेलर रिलीज
HBD Ankita Lokhande: अंकिताला व्हायचं होतं एअर होस्टेस, नावदेखील बदललं!
Actress Wedding 2023 : बी-टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रींनी सात फेरे घेऊन बांधली लग्नगाठ
अभिनेत्री छवी मित्तलने ( Chhavi Mittal ) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केसांना आग लागल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात छबीच्या केसांना आग लागल्याचे दिसत आहे. तर ताबोडतोब निर्माता करण जोहरने प्रसंगावधान राखत ही आग विझविली आहे. याच दरम्यान छवीने ‘वास येत आहे माझ्या केसांना आग तर लागली नाही ना?’ असे म्हटलं आहे. तर यावेळी एकाने ‘होय’ असे उत्तर दिले आहे. यानंतर तिला स्वत: च्या केसांना आग लागल्याचे समजते.
अभिनेत्री छवी मित्तल आणि करण जोहर दोघेजण एका शुटिंगच्या सेटवर असताना ही आग लागली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘सेटवर अपघात होतात, पण माझ्या केसांना आग लागणे सर्वात भयंकर होते!, यावेळी मी चुकून लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर करण जौहर यांनी स्वतःच्या हातांनी ही आग विझवल्याबद्दल आणि मला वाचवल्याबद्दल आभार’. असे तिने लिहिलं आहे. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहते मात्र, आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडिओला अभिनेत्री महिमा चौधरीने ‘ओह गॉड’ असे कॉमेन्टस करताना लिहिले आहे. तर करण जोहरने ‘पहिल्यांदा मला वाटले की, आग लागली आहे कारण तू हॉट आहेस. पण नंतर कळलं की, ती मेणबत्ती आहे. असे त्याने म्हटलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)
The post छवी मित्तलच्या केसांना आग लागताच करण जोहरनं वाचवला जीव appeared first on Bharat Live News Media.