IPL Auction : पॅट कमिन्सवर विक्रमी बोली, 20.50 कोटीला हैदराबादने केले खरेदी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यंदाच्या आयपीएल लिलावात मालामाल झाला. बंगळूर आणि हैदराबाद संघात त्याला आपल्या गोटात घेण्यासाठी स्पर्धा सुरू होती. अखेर यामध्ये हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 कोटी रूपयांची विक्रमी बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. (IPL Auction 2024) त्याची मूळ किंमत २ काेटी रुपये हाेती. कमिन्स हा आजपर्यंतचा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच सॅम कुरनवर १८.५० लाखांची बोली लागली होती.
हर्षल पटेलवर लागली ११.७५ कोटींची बोली
वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्यावर पंजाब किंग्जने ११.७५ कोटींची बोली लावली. हर्षलसाठी गुजरात आणि पंजाब संघात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.
शार्दुल ठाकूर पुन्हा चेन्नईत
आयपीएल 2024 हंगामासाठी दुबईमध्ये लिलाव सुरू आहे. यामध्ये गोलंदाजांच्या लिलावामध्ये शार्दुल ठाकूरला चेन्नईने पुन्हा एकदा आपल्या संघात सामील करून घेतले आहे. शार्दुल ठाकूरने गेल्या मोसमात कोलकता नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली होती. परंतु, यावेळी कोलकताने त्याला रिटेन केले नाही. यामुळे तो 2 कोटी या बेस प्राईससह लिलावात होता. लिलवात चेन्नईने 4 कोटीमध्ये आपल्या संघात घेतले.
श्रीलंकेच्या फिरकीपटूची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये होती आणि हैदराबादने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. अन्य कोणत्याही संघाने हसरंगावर बोली लावली नाही.
अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला उमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) २०२४ च्या हंगामासाठी आज दुबईत लिलाव सुरू आहे. पुढील आवृत्ती भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मार्च २०२४ मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी आज ‘आयपीएल’चा लिलाव सुरु झाला. या लिलावाच्या सुरुवातीला कॅप्ड खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजच्या T20I क्रिकेट संघाचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याच्यावर पहिली बोली लावण्यात आली. त्याला राजस्थान रॉयल्यने ७ कोटी ४० लाखांना खरेदी केले. पॉवेलची बेस प्राइस १ कोटी होती. (IPL Auction 2024)
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड हैदराबादच्या ताफ्यात
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला सनरायजर्स हैदराबादने ६. ८ कोटी रुपये मोजून आपल्याकडे घेतले. त्याची बेस प्राइस २ कोटी होती. २ कोटी बेस प्राइस असणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याच्यासाठी दिल्ली आणि राजस्थानमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून आली. पण अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला ४ कोटींना खरेदी केले. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राइस २ कोटी होती.
श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगा याला सनरायजर्स हैदराबादने १.५ कोटींना खरेदी केले. न्यूझीलंडला अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याला चैन्नई सुपर किंग्जने १ कोटी ८० लाख रुपयांना घेतले. रचितची बेस प्राइस ५० लाख होती. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर याला चैन्नईने ४ कोटींना खरेदी केले.
WOAH 🤯🤯
Pat Cummins is SOLD to Sunrisers Hyderabad 🧡 for a whopping INR 20.5 Crore 🔥🔥
Congratulations to the @SunRisers 🙌#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
हेही वाचा :
IPL Auction 2024 : ‘या’ दिग्गज खेळांडूंवर बोली लागलीच नाही!
IPL Auction 2024 | ‘रोव्हमन पॉवेल’साठी राजस्थानने मोजले ७ कोटी ४० लाख, ट्रॅव्हिस हेडची ६.८ कोटींना खरेदी
ऋषभ पंत IPL लिलावात आज बजावणार ‘ही’ भूमिका
The post IPL Auction : पॅट कमिन्सवर विक्रमी बोली, 20.50 कोटीला हैदराबादने केले खरेदी appeared first on Bharat Live News Media.