‘ओबीसी’ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या : आ.राहुल कुल

यवत : पुढारी वृत्तसेवा :  ओबीसी समाजबांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे व धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करावा, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे. या वेळी बोलताना आमदार अ‍ॅड. कुल म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी समाज हा सुमारे 54 टक्के आहे, त्यांना 27 टक्के … The post ‘ओबीसी’ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या : आ.राहुल कुल appeared first on पुढारी.

‘ओबीसी’ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या : आ.राहुल कुल

यवत : Bharat Live News Media वृत्तसेवा :  ओबीसी समाजबांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे व धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करावा, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे. या वेळी बोलताना आमदार अ‍ॅड. कुल म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी समाज हा सुमारे 54 टक्के आहे, त्यांना 27 टक्के आरक्षण आहे. ओबीसी प्रवर्गात 300 हून अधिक जातींचा समावेश असून, व्हीजेएनटी, माळी, तेली, धनगर, वंजारी, कुणबी या सगळ्या प्रमुख जाती आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजबांधवांना आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून जोर धरू लागली आहे. 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला.
त्यात कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत विविध सवलतींसह सुमारे 16 टक्के आरक्षण मंजूर केल्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य आणि तर्कशुद्ध कारण असले पाहिजे. असे असताना महाराष्ट्रात मराठा आरक्षण देताना ती दिलेली नाहीत. किंबहुना 2019 नंतर आलेल्या सरकारला ही भूमिका स्पष्टपणे मांडता आली नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. ‘ओबीसी’ समाजासह इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, राज्यातील आरक्षणाची असलेली 50 टक्के मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याकरिता समाजाने वारंवार मागणी करूनही याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. हा समाज भटक्या व विमुक्त जातीमध्ये येत असून, ‘धनगड’ व ‘धनगर’ या नामफरकाच्या वादामुळे, या समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश होत नसल्याच्या अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. ‘धनगड’ व ‘धनगर’ या नावाबाबत तपासणीसाठी उपसमिती स्थापन करूनही अद्याप त्यांचा कोणताही अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला नाही. यासाठीदेखील सरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी सांगितले.
हेही वाचा :

Pune : आळेफाटा परिसरात मालवाहू कंटेनरला आग
धक्कादायक! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या; खडकवासला येथील प्रकार

The post ‘ओबीसी’ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या : आ.राहुल कुल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source