सातारा : दगडाने ठेचून कुसूरमधील युवकाचा खून
कराड : Bharat Live News Media वृत्तसेवा बीअर बारमध्ये झालेल्या वादावादीचा राग मनात धरून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणार्या ढेबेवाडीत ऋतुराज दिलीप देशमुख या युवकाचा खून करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील कुसूर गावचा रहिवासी असलेला ऋतुराज हा ढेबेवाडीतील बीअर बारमध्ये बसला होता. त्यावेळी तेथे असलेल्या काही लोकांशी त्याची वादावादी झाली. वादावादीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या वादावादीनंतर संशयितांनी ऋतुराजला दमदाटी करत वांग नदीकाठी नेले आणि तेथे गेल्यानंतर ऋतुराजचा दगडाने ठेचून त्याचा खून केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काही वेळातच पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमी ऋतुराजला उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणातील संशयितांचा ढेबेवाडी पोलिसांकडून शोध सुरू आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : लोकसभेतून सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे निलंबित
Sharad Pawar | शरद पवारांचे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र, केली ‘ही’ मागणी
‘रणांगणात प्रत्यक्षात उतरण्याची वेळ, ‘INDIA’ आघाडीला नवा समन्वयक नियंत्रक चेहरा हवाय’
The post सातारा : दगडाने ठेचून कुसूरमधील युवकाचा खून appeared first on Bharat Live News Media.