Pune : आळेफाटा परिसरात मालवाहू कंटेनरला आग
आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट घेऊन जाणा-या मालवाहू कंटेनरचा टायर फुटून अचानकपणे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे स्पेअर पार्ट जळाले. ही दुर्घटना सोमवारी (दि. १८) मध्यरात्री बारा वाजण्याचे सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, पुणे-चाकण येथून नाशिककडे चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्टस घेऊन भरधाव वेगात जाणा-या मालवाहतूक कंटेनरचा (एनएल ०१ एएच १४४३) मागील टायर आळेफाटा परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर फुटला. यामुळे आगीचा भडका उडाला. चालकाने सतर्कता दाखवत वाहनाचे नियंत्रण केले व वाहकासह खाली उड्या मारल्या.
कंटेनरला आग लागल्याचे कळताच आळेफाटा पोलिस ठाण्याचे समाधान अहिवळे चौरेमळा येथील नागरिक व महिला तसेच उपसरपंच ऋषिकेश गडगे विविध कार्यकारी सोसायटी उपाध्यक्ष प्रमोद गडगे, गणेश भुजबळ, प्रणव गडगे, विजय देवकर गणेश देवकर, राजेंद्र गडगे घटनास्थळी आले. त्यांनी पिंपळगाव जोगा कालव्याचे पाणी बादलीच्या सहाय्याने आणत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमन बंब उशिराने दाखल झाला; मात्र तोपर्यंत कंटेनरमधील स्पेअर पार्टचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत सकाळी १२ वाजेपर्यंत कोणतीही खबर आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल नव्हती. यामुळे या आगीत नेमके किती रूपयांचे नुकसान झाले याची माहिती समजू शकले नाही.
हेही वाचा :
Winter Session 2023: संसदेत विरोधकांची घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब
Nashik News : चेहऱ्यावर स्प्रे मारून दागिने खेचले, महिलेविरोधात तक्रार
The post Pune : आळेफाटा परिसरात मालवाहू कंटेनरला आग appeared first on Bharat Live News Media.