Mismatched Season 3 चा पहिला फोटो रोहित सराफकडून रिलीज
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मिसमॅच्ड सीझन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Mismatched Season 3) अभिनेता रोहित सराफने पहिला फोटो पोस्ट करून चाहत्यांना खुशखबर दिली. रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांनी चाहत्यांना पुढच्या सीजन येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. (Mismatched Season 3)
संबंधित बातम्या –
Prabhas Salaar Movie : एसएस राजामौली यांनी घेतले सालारचे पहिले तिकीट
Ira Khan Wedding : इरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची पत्रिका व्हायरल; मुंबईत अडकणार लग्नबंधनात
Salaar Advance Booking : प्रभासच्या ‘सालार’ ची शाहरूखच्या ‘डंकी’ला टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोस कमाई
चर्चा मिसमॅच्ड सीझन ३ ची
रोहित सराफने सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे आणि लवकरच मिसमॅच्ड 3 येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. चर्चेत असलेल्या या वेब सीरिजसाठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं कळतंय.
दिग्दर्शक आकर्ष शर्मासह या तिघांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता लवकरच मिसमॅच्ड 3 चा सीजन येणार आहे. चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड ३ ही सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सीझनमध्ये रोहित सराफचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.
View this post on Instagram
A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)
रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा अंदाज यातून अनुभवयाला मिळाला होता. सीझन 3 ची उत्सुकता बघायला मिळत असून हास्य, प्रेम आणि अप्रत्याशित ट्विस्टने भरलेल्या मिसमॅच्डच्या मनमोहक दुनियेत पुन्हा प्रवेश करण्यास सगळेच उत्सुक आहेत.
The post Mismatched Season 3 चा पहिला फोटो रोहित सराफकडून रिलीज appeared first on Bharat Live News Media.