लग्नात एकट्याने फस्त केले 150 रसगुल्ले!

पाटणा : काही लोक खवय्ये असतात तर काही खादाडही असतात. मागे एकदा लग्नात अनेक गुलाबजाम फस्त करणार्‍या माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक माणूस तब्बल 150 रसगुल्ले फस्त करत असताना दिसतो! सोशल मीडियावर बिहारमधील या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काहीजण लग्न समारंभातील भोजनाचा … The post लग्नात एकट्याने फस्त केले 150 रसगुल्ले! appeared first on पुढारी.

लग्नात एकट्याने फस्त केले 150 रसगुल्ले!

पाटणा : काही लोक खवय्ये असतात तर काही खादाडही असतात. मागे एकदा लग्नात अनेक गुलाबजाम फस्त करणार्‍या माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक माणूस तब्बल 150 रसगुल्ले फस्त करत असताना दिसतो!
सोशल मीडियावर बिहारमधील या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काहीजण लग्न समारंभातील भोजनाचा आनंद घेता दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये दिसणारी एक व्यक्ती बराच वेळ बैठक मारून चक्क 150 रसगुल्ले खाऊन फस्त करत असताना दिसते. लग्नाला आलेले सर्व पाहुण्यांचे जेवण उरकल्यानंतरही ही व्यक्ती आपल्या मित्रांबरोबर बसून रसगुल्ले खात होता.
सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार बिहारमधील दरभंगा येथील एका लग्न समारंभातील हा व्हिडीओ आहे. विक्रमी संख्येने रसगुल्ले फस्त करणारा हा तरुण तब्बल 4 तास जेवत होता. मुलीकडून पाहुणा म्हणून आलेल्या या तरुणाला मुलीच्या घरचे आग्रह करून जेवायला घालत होते. सोशल मीडियावरील दाव्यानुसार या तरुणाचे नाव त्रिलोक पाठक असे आहे. तो दरभंगामधील बिरोल येथील हरौली गावाचा रहिवाशी आहे. त्रिलोक प्रत्येक लग्नामध्ये अशाच पद्धतीने जेवतो, असे गावकर्‍यांनी सांगितले.
कधी 100-150 रसगुल्ले खातो तर कधी 100-150 आंबे खातो. पोटभर जेवल्यानंतर त्रिलोक 2 ते 4 किलो नुसतं दही खाऊ शकतो, असा गावकर्‍यांचा दावा आहे. मिथिला हा प्रांत तेथील खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील पाहुणचाराची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये असते. मिथिला संस्कृतीची ओळख असलेल्यांना मुलीकडील नातेवाईक कशापद्धतीने आग्रहाने आपल्या पाहुण्यांना खाऊ घालतात याची कल्पना आहे. आग्रह करून नातेवाईकांना खाऊ घालण्याची येथे परंपराच आहे. त्रिलोकलाही अशाच पद्धतीने तब्बल 4 तास जेवू घालण्यात आले.
The post लग्नात एकट्याने फस्त केले 150 रसगुल्ले! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source