Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झाला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता याबाबत गँगस्टर छोटा शकील याने मोठा दावा केला आहे. ( Dawood Ibrahim poisoned )
१७ डिसेंबर पासून दाऊदवर विषप्रयोग झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. ‘सीएनएन-न्यूज 18’ शी केलेल्या विशेष संभाषणात छोटा शकील याने म्हटलं आहे की, दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झालेला नाही. त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावरील चर्चा ही अफवांवर आधारित आहे. दाऊद जिवंत आहे. मी त्याला भेटलो आहे.” ( Dawood Ibrahim poisoned )
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाऊदला विषबाधा झाल्याची चर्चा सुरु आहे. काहींनी तर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांच्या अकाऊंटचे स्क्रीनशॉट पोस्ट कर दाऊदचा मृत्यू झाल्याचाही दावा केला आहे. मात्र असा दावा करणारे खातेच बनावट असल्याची पुष्टी झाली आहे. ( Dawood Ibrahim poisoned )
The post गँगस्टर छोट शकीलचा मोठा दावा, “दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग…” appeared first on Bharat Live News Media.
गँगस्टर छोट शकीलचा मोठा दावा, “दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग…”