आजरा साखर कारखाना निवडणूक : आज फैसला
आजरा, Bharat Live News Media वृत्तसेवा : गवसे येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘अ’ वर्गाच्या 77 आणि ‘ब’ वर्गाच्या 12 अशा एकूण 89 केंद्रांच्या मतपेट्यांची 46 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 225 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा मंगळवारी फैसला होणार आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत कोणत्या आघाडीच्या बाजूने कल आहे, हे स्पष्ट होणार आहे. (Kolhapur News)
सकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून मतपेट्या पोलिस बंदोबस्तातून आजरा पंचायत समितीमध्ये नेल्या जाणार आहेत. पंचायत समितीच्या सभागृहात उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर पेट्या खुल्या करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 45 तर दुसर्या टप्प्यात 44 पेट्यांची मतमोजणी होणार आहे. पहिली फेरी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान संपणार आहे. (Kolhapur News)
पहिल्या फेरीतच निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणीची जय्यत तयारी निवडणूक विभागाने केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अंतिम निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता आहे.
The post आजरा साखर कारखाना निवडणूक : आज फैसला appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या आजरा साखर कारखाना निवडणूक : आज फैसला
आजरा साखर कारखाना निवडणूक : आज फैसला
आजरा, पुढारी वृत्तसेवा : गवसे येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘अ’ वर्गाच्या 77 आणि ‘ब’ वर्गाच्या 12 अशा एकूण 89 केंद्रांच्या मतपेट्यांची 46 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 225 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा मंगळवारी फैसला होणार आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत कोणत्या आघाडीच्या बाजूने …
The post आजरा साखर कारखाना निवडणूक : आज फैसला appeared first on पुढारी.