कोल्हापूर : दोन दारूड्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानकालगत गजबजलेल्या पादचारी उड्डाणपुलाजवळ सोमवारी रात्री एक विचित्र घटना घडली. मोबाईलवरून झालेला वाद विकोपास गेला आणि एका दारूड्याने दुसर्या दारूड्याच्या डोक्यात सोडा आणि बीअरची बाटली फोडली. या अपघातात विनायक विश्वास लोंढे (वय 32, रा. शाहू कॉलेज चौक, विचारेमाळ) हा फिरस्ता मजूर ठार झाला. याप्रकरणी हल्लेखोर समीर ऊर्फ लखन युनूस मणेर (33, रा. विक्रमनगर) याला पोलिसांनी रात्री अटक केली.
शहरातील मध्यवर्ती आणि सतत वर्दळ असलेल्या पादचारी उड्डाणपुलाजवळील बारलगत रात्री साडेआठ वाजता ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. डोक्यात झालेल्या प्रहारामुळे विनायक लोंढे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. गंभीर अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विनायक लोंढे हा मजुरीची कामे करून उदरनिर्वाह करत होता. दिवसभर काम करून रात्री त्याचा ठिय्या पादचारी उड्डाणपुलाखालील कट्ट्यावर असे. रात्री साडेआठला मद्यधुंद अवस्थेत विनायक हा त्याच्या दोन साथीदारांसमवेत सोडा विक्रेत्याजवळ आला होता. नेमके याचवेळी हल्लेखोर समीर मणेर हादेखील मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. मोबाईलच्या कारणातून दोघांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली.
संशयित मणेर याने विनायकला धक्काबुक्की केल्याने दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. संशयिताने शेजारच्या टपरीवरील सोडा आणि बीअरच्या बाटलीने त्याच्या डोक्यात प्रहार केला. वर्मी हल्ल्यामुळे विनायक जागीच कोसळला. विनायक रस्त्यावर तडफडत असतानाही संशयिताने त्याच्या दिशेने दारूच्या आणि सोड्याच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे विनायक बेशुद्ध पडला.
भर चौकात झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षा व्यावसायिक जावेद अजिज मणेर (35, रा. कदमवाडी) यांनी सहकार्यांच्या मदतीने जखमीला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मध्यवर्ती चौकातील खुनीहल्ल्याच्या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयित समीर मणेर हा सराईत गुन्हेगार असून, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्याला दीड महिन्यापूर्वी अटक झाली होती. संशयिताने रात्री उशिरा खुनाची कबुली दिली असल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले.
The post कोल्हापूर : दोन दारूड्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या कोल्हापूर : दोन दारूड्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू
कोल्हापूर : दोन दारूड्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानकालगत गजबजलेल्या पादचारी उड्डाणपुलाजवळ सोमवारी रात्री एक विचित्र घटना घडली. मोबाईलवरून झालेला वाद विकोपास गेला आणि एका दारूड्याने दुसर्या दारूड्याच्या डोक्यात सोडा आणि बीअरची बाटली फोडली. या अपघातात विनायक विश्वास लोंढे (वय 32, रा. शाहू कॉलेज चौक, विचारेमाळ) हा फिरस्ता मजूर ठार झाला. याप्रकरणी हल्लेखोर समीर ऊर्फ लखन युनूस मणेर (33, …
The post कोल्हापूर : दोन दारूड्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.