नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार जाहीर

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : आदिवासी दुर्गम भागाचे देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करताना बजावलेली कामगिरी आणि निभावलेले अभ्यासपूर्ण नेतृत्व याची दखल घेऊन देश स्तरावरचा मानाचा ‘संसद महारत्न’ हा पुरस्कार यंदा खासदार डॉ. हिना गावित यांना घोषित झाला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराचे वितरण १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्ली येथे केले जाणार आहे. Hina Gavit लोकसभेच्या कार्यकाळातील कामगिरीच्या सातत्यासाठी … The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.
नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार जाहीर


नंदुरबार, Bharat Live News Media वृत्तसेवा : आदिवासी दुर्गम भागाचे देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करताना बजावलेली कामगिरी आणि निभावलेले अभ्यासपूर्ण नेतृत्व याची दखल घेऊन देश स्तरावरचा मानाचा ‘संसद महारत्न’ हा पुरस्कार यंदा खासदार डॉ. हिना गावित यांना घोषित झाला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराचे वितरण १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्ली येथे केले जाणार आहे. Hina Gavit
लोकसभेच्या कार्यकाळातील कामगिरीच्या सातत्यासाठी संसद महारत्न पुरस्कार पाच वर्षांतून एकदा दिला जातो. मार्च २०२३ पर्यंत, १३ पुरस्कार सोहळ्यांद्वारे १०६ संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. चेन्नईस्थित एनजीओ प्राइम पॉइंट फाऊंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेससेन्स द्वारे पाच वर्षातून एकदा दिला जाणारा ‘संसद महारत्न पुरस्कार’, संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची एक अर्थाने कबुली देतो. Hina Gavit
Hina Gavit : खासदार डॉ.हिना यांची अशी आहे कामगिरी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित या अतिदुर्गम भागाचे देश स्तरावर प्रतिनिधित्व करीत आहेत. हे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी संसदेत बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. लोकसभा अधिवेशना दरम्यान वेळोवेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर, आदिवासी बेघरांना घरकुल मिळवून देण्याच्या प्रश्नावर, महुआ मोइत्रा यांच्या कथीत भ्रष्टाचारासारख्या प्रकरणांवर संसदेतील चर्चेत सहभागी होऊन आवाज उठवताना डॉक्टर हिनाताई गावित पाहायला मिळाल्या आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील विकास कामांना गती देण्याची त्यांची हातोटी आणि कार्यपद्धती तर सध्या कौतुकाचा विषय बनला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना, नंदुरबार रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करणारे उपाय योजना अशा अनेक ठळक विकास कामांचा दाखला देण्याबरोबरच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामासाठी त्यांनी मिळवून दिलेला निधी, जल जीवन मिशन योजनेतून अनेक दुर्लक्षित गावांना मिळवून दिलेल्या पाणी योजना, दुर्गम पहाडपट्टीतील गावांमध्ये केलेले विद्युतीकरण, पंतप्रधान आवास योजनेचा लाखो लाभार्थ्यांना दिलेला लाभ, केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिलेली चालना त्याचबरोबर उज्वला गॅस योजना आणि तत्सम योजनांचे पाड्या-पाड्यात पोहोचवलेले लाभ; यांचेही दाखले त्यासाठी दिले जात आहेत.
हेही वाचा 

Gram Panchayat Election : नंदूरबार जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबररोजी मतदान
नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास
नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार जाहीर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source