परभणी: सोनपेठ येथे शुक्रवारी मनोज जरांगे- पाटील यांची सभा
सोनपेठ, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या पाचव्या टप्प्यात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. 22) दुपारी २ वाजता सोनपेठ शहरातील जिनिंग मैदान येथे जाहीर सभा आयोजीत केली आहे. जरांगे – पाटील यांची सोनपेठ येथे सभा व्हावी, यासाठी अनेक दिवसांपासून तालुक्यातील बांधव प्रयत्नात होते. काल सभेचा पाचवा टप्पा जाहीर होताच सभेसाठी सोनपेठचा समावेश करण्यात आला.
या अनुषंगाने सभेच्या तयारीसाठी शनिवारी (दि.16) छत्रपती शिवाजी महाराज चौक साखळी उपोषणस्थळी एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये विविध समित्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला परळी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, परभणी, माजलगाव परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेच्या नियोजनासाठी सभास्थळी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
या सभेला सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा तालुका सोनपेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा
परभणी ; आयशर ट्रकला धडक देत ट्रक पुलावरून कोसळला; दोनजण जखमी
परभणी: ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील सावरगाव येथील ४ जण निर्दोष
परभणी: अवकाळी पावसामुळे ताडकळस परिसरात दुबार पेरणीचे संकट
The post परभणी: सोनपेठ येथे शुक्रवारी मनोज जरांगे- पाटील यांची सभा appeared first on Bharat Live News Media.