Market update : कांद्याच्या दरात घट ; मिरची, गवार, लसूण अन् शेवग्याच्या दरात वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  नवा कांदा बाजारात विक्रीस आल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो दहा ते पंधरा रूपयांनी घटले आहे. तर हवामानातील बदलाचा फटका मिरची, गवार आणि शेवग्याच्या उत्पादनाला बसल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे; तसेच लसणाचे दर अद्यापही तेजीत असून, पालेभाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच … The post Market update : कांद्याच्या दरात घट ; मिरची, गवार, लसूण अन् शेवग्याच्या दरात वाढ appeared first on पुढारी.

Market update : कांद्याच्या दरात घट ; मिरची, गवार, लसूण अन् शेवग्याच्या दरात वाढ

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  नवा कांदा बाजारात विक्रीस आल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो दहा ते पंधरा रूपयांनी घटले आहे. तर हवामानातील बदलाचा फटका मिरची, गवार आणि शेवग्याच्या उत्पादनाला बसल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे; तसेच लसणाचे दर अद्यापही तेजीत असून, पालेभाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात नवीन कांद्याचे दर प्रतिकिलो 40 तर जुना कांदा 55 ते 60 रूपये दराने विक्री होत आहे. तर आवक घटल्याने मिरची प्रतिकिलो 80 ते 90, गवार 100, लसूण 350 ते 400 आणि शेवगा 150 रूपये दराने विक्री होत आहे. कोथिंबीरीची जुडी 15, मेथी, पालक 20 तर कांदा पात 25 ते 30 रूपयांना विक्री होत आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर ः (प्रतिकिलो)
शेवगा 60 ते 70, मिरची 30 ते 40, भेंडी 35 ते 40, गवार 70 ते 90, काकडी 25 ते 30, कांदा 15 ते 20, बटाटा 12 ते 15, टोमॅटो 10 ते 12, आले 65 ते 70, लसूण 150 ते 160, मटार 30 ते 35 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.
मोशी उपबाजारातील आवक ः (क्विंटल)
कांदा 420, बटाटा 563, आले 34, लसूण 10, गाजर 142, गवार 17, शेवगा 10, गवार 5, हिरवी मिरची 114, टोमॅटो 488, काकडी 90, भेंडी 38 क्विंटल एवढी आवक झाली आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 42700 गड्डी, फळे 270 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3610 क्विंटल एवढी आवक झाली.
चंपाषष्ठीनिमित्त बाजारात भरताची वांगी आणि कांदापातीला अधिक मागणी होती. त्यामुळे दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
 
The post Market update : कांद्याच्या दरात घट ; मिरची, गवार, लसूण अन् शेवग्याच्या दरात वाढ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source