जळगाव : पाईपलाईन लीक झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया

जळगाव- भुसावळ नगर परिषदेची मुख्य पाईपलाईन ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 च्या ओव्हर ब्रिजच्या खालून गेलेली असल्याने याच ठिकाणी पाईपलाईन लीक झाल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून जवळपास आठ ते नऊ लाख लिटर पाणी वाया जात आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचा खर्च कोण देणार यावर पत्र व्यवहार व बैठका सुरू आहे. त्यामध्ये तोडगा निघत नसल्याने अजूनही लाखो लिटर … The post जळगाव : पाईपलाईन लीक झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया appeared first on पुढारी.

जळगाव : पाईपलाईन लीक झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया

जळगाव- भुसावळ नगर परिषदेची मुख्य पाईपलाईन ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 च्या ओव्हर ब्रिजच्या खालून गेलेली असल्याने याच ठिकाणी पाईपलाईन लीक झाल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून जवळपास आठ ते नऊ लाख लिटर पाणी वाया जात आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीचा खर्च कोण देणार यावर पत्र व्यवहार व बैठका सुरू आहे. त्यामध्ये तोडगा निघत नसल्याने अजूनही लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र ही पाईपलाईन या पुलाखालून गेली कशी आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. कोणाचे नियोजन चुकले हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भुसावळ नगरपरिषद ही खानदेश मधील अ दर्जा प्राप्त नगरपालिका आहे. जवळपास अडीच ते तीन लाख नागरिक या नगरपालिकेचे हद्दीमध्ये राहतात. या नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा होणारी मेन रायझिंग ही पाईपलाईन जामनेर रोड कडून नाहाटा कॉलेज कडे जाते. त्यानंतर एक पाईपलाईन ही नाहाटा कॉलेजच्या पाण्याच्या टाकी पासून खडका रोड येथील पाण्याच्या टाकीकडे जाते. पूर्वी ही लाईन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 च्या मधून होती मात्र रस्त्याचे विस्तारीकरण करण्यासाठी ही पाईपलाईन रस्त्याच्या कडेला घेण्याचे ठरले मात्र त्यावेळेस नहाटा कॉलेज टाकी पासून क्रॉसिंग करताना तिला ओव्हर ब्रिजच्या खालून घालण्यात आली. आज ती लीक झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे मात्र यामध्ये नाही व नगरपालिकांमध्ये पत्रव्यवरांचे युद्ध सुरू झालेले आहेत.
नाही यांच्या पत्रानुसार त्यांनी दुरुस्ती करावी पण त्याच्या नुसार पत्रात म्हटले आहे की. या रस्त्याच्या दुरुस्तीचा खर्च करणार कोण! नगरपालिका हा खर्च देण्यास तयार नाही त्यांनी सुद्धा सांगितले की ही पाईपलाईन चुकीच्या जागी टाकली. नगरपालिका हा खर्च करण्यास तयार नाही. त्यामुळे दोघांच्या या युद्धात नागरिकांना पाणी कमी दाबाने मिळत आहे तर दुसरीकडे शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
भुसावळ नगर परिषदेचे पाणीपुरवठ्याच्या भिंत यांच्याशी संपर्क साधला असेल त्यांनी सांगितले की, आम्ही नाहीशी पत्रव्यवहार करीत आहे. नगरपालिकेजळ पाहिजे तसा फंड नाही मात्र यांच्या चुकीच्या नियोजनामुळे ती पाईपलाईन पुलाखालून गेलेली आहे.- संदीप देशमुख, पाणीपुरवठा अभियंता
नाहीचे अधिकारी प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या स्टेनो यांनी संपर्क साधून अधिकाऱ्यांना याबाबत सांगतो असे सांगितले.
हेही वाचा :

परभणी : स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर मिळणार तीन गावांना पक्का रस्ता; २३ गावांच्या ‘उलगुलान’ आंदोलनाला यश
Lok Sabha MP Suspends : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांचे निलंबन

The post जळगाव : पाईपलाईन लीक झाल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया appeared first on Bharat Live News Media.

Go to Source