Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरातत्त्व विभागाने ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे पूर्ण केला असून हा अहवाल सोमवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला. यावर आता २१ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. पुरातत्त्व विभागाने सादर केलेला अहवाल हा सीलबंद लखोट्यात आहे, हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी हिंदू पक्षाने केला आहे. (Gyanvapi Mosque)
हिंदू पक्षाचे बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “हा अहवाल जनतेसाठी खुला करण्यात यावा. सीलबंद अहवाल सादर करून पुरातत्त्व विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केली आहे. या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागितली असून यावर २१ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.” तर अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने हा अहवाल जाहीर न करण्याच मागणी केली आहे.
#BREAKING | ASI Submits Its Sealed Cover Report On The Scientific Survey Of Gyanvapi Mosque Before Varanasi Court
#ASI #Gyanvapi #GyanvapiMosque #GyanvapiCase #VaranasiCourthttps://t.co/FL0HyLxeGv
— Live Law (@LiveLawIndia) December 18, 2023
वाराणसी जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व विभागाला ज्ञानवापी मशिद परिसराचा पाहाणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ज्ञानवापी मशिद ही काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला आहे. १७व्या शतकातील ही मशिद पूर्वीच्या हिंदू मंदिरावर उभारली आहे का याची पाहाणी करण्यासाठी पुरात्तत्व विभागाला हा अहवाल देण्यासाठी सांगण्यात आले होते.
हेही वाचा
‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षण अहवालासाठी ‘एएसआय’ने मागितला आठ आठवड्यांचा कालावधी
Gyanvapi Survey | ज्ञानवापी मशिदीचे तळघर उघडले! मूर्ती, त्रिशूल अन् भिंतींवर आढळल्या कमळाच्या खुणा?
‘ज्ञानवापी’ प्रकरणी आदित्यनाथ यांचे मोठे विधान, “मशिदीत त्रिशूल काय करत होते?”
The post ज्ञानवापी मशिद प्रकरणी ‘पुरातत्त्व’चा अहवाल सादर; 21 डिसेंबरला सुनावणी appeared first on Bharat Live News Media.