‘पुढील निवडणुकीत भंडारा विधानसभा शिवसेनेचीच’

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : भंडारा विधानसभा ही शिवसेनेच्या हक्काची जागा आहे. येणाऱ्या निवडणुकीत या क्षेत्रातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचाच आमदार असेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी केले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पदाधिकाऱ्यांची बैठक भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आ. भास्कर जाधव बोलत होते. घाबरू नका, पेटून उठा, एका विश्वासाने, निर्धाराने … The post ‘पुढील निवडणुकीत भंडारा विधानसभा शिवसेनेचीच’ appeared first on पुढारी.
‘पुढील निवडणुकीत भंडारा विधानसभा शिवसेनेचीच’


भंडारा : Bharat Live News Media वृत्तसेवा : भंडारा विधानसभा ही शिवसेनेच्या हक्काची जागा आहे. येणाऱ्या निवडणुकीत या क्षेत्रातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचाच आमदार असेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी केले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पदाधिकाऱ्यांची बैठक भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आ. भास्कर जाधव बोलत होते. घाबरू नका, पेटून उठा, एका विश्वासाने, निर्धाराने उठून भंडारा विधानसभा क्षेत्रातून आपला शिवसेनाचाच उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
संबंधित बातम्या 

नगर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा खालावला
नगर महापालिकेत 1 जानेवारीपासून येणार प्रशासकराज
Stock Market Closing Bell | शेअर बाजारात नफा वसुली! सेन्सेक्स ७१,३१५ वर बंद, नेमकं काय घडलं?

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ. भास्कर जाधव, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, महिला संघटीका शिल्पा बोडखे, जिल्हासंपर्क प्रमुख प्रदीप खोपडे, मनोज कपोते, सहसंपर्क प्रमुख नरेश डाहारे, जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अ‍ॅड. रवि वाढई, रश्मी पातुरकर, श्रीकांत मेश्राम, जितू उइके, गोंदिया जिल्हासंपर्क प्रमुख बाबा ठाकुर, नरेश माळवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी केले. मनोज कपोते यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संगठन बांधणी करून, जनसंपर्क वाढवून येण्याऱ्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करून सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी नरेश डाहारे तसेच नरेंद्र पहाडे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
आभार प्रदर्शन लवकुश निर्वाण यांनी केले. कार्यक्रमासाठी शहरप्रमुख आशीक चुटे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष मनीष सोनकुसरे, शहर संघटक शैलेश खरोले, उपशहरप्रमुख राकेश आग्रे, सुधीर उरकुडे, ललित बोंद्रे, विनोद डाहारे, सविता हटवार, वंदना वैरागडे, ईश्वर टाले आदींनी सहकार्य केले.
 
The post ‘पुढील निवडणुकीत भंडारा विधानसभा शिवसेनेचीच’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source