Jalgaon Crime : रखवालदाराचा खून करणारे दोघेही पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon Crime : रखवालदाराचा खून करणारे दोघेही पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी रखवाली करणाऱ्या रखवालदाराचा (दि. 14) च्या रात्री दोन अज्ञातांनी खून केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बिडवाणी या ठिकाणावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील वावळदा ते म्हसावद दरम्यान बिलवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटर हीटर पळवून नेले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, विजयसिंह पाटील , जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप सावडे, ईश्वर पाटील, लोकेश माळी यांचे पथक खून्यांच्या शोधासाठी पाठविले होते.
घटनास्थळी मिळालेली माहिती, पुरावे व सीसीटीव्हीच्या आधारे व मालक राजेंद्र पाटील यांच्याकडील सरदार पवन बहाधीर बारेला यावर संशय बाळगल्याने त्याची माहिती घेतली असता तो कुटुंबासह व शालका सह सासरवाडी सलिताडा तालुका राजापूर जिल्हा बिडवाणी मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.  पथकाने ठिकाण ते ठिकाण गाठून पवन बारेला व वाधर सिग शोभाराम बारेला यांना ताब्यात घेतले.
नेमकं काय घडलं? चोरांनी सांगितला प्रकार 
अटक करण्यात आलेल्या दोघांनी सांगितले, ट्रॅक्टर चोरी करून घेऊन जात होतो. रखवालदार पांडुरंग पाटील हा उठून  विरोध करू लागल्याने ट्रक्टर व ट्रॉली जॉईन करण्याचे अवजार छातीत व डोक्यात मारून त्याला ठार केले.  ट्रॅक्टर घेऊन निघालो, ट्रॅक्टर रस्त्यात बंद पडल्याने मोटरसायकलने पुन्हा सासरी निघून आलो असल्याचे त्यांनी सांगतिले.  सदर दोघाही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची मेडिकल तपासणी करून पुढील तपासणी एमआयडीसी पोलिस करणार आहेत.
हेही वाचा :

Babar Azam : पाकिस्तान टी-20 संघाच्या कर्णधारपदी शाहिन आफ्रिदी, तर तर ‘हा’ खेळाडू बनला कसोटी कर्णधार
एवढेचं बघायचं बाकी होतं! बॅकलेस ड्रेसमध्ये Urfi Javed चा नवा व्हिडिओ चर्चेत
ISRO Update on Chandrayaan 3: चांद्रयान-३ बाबत इस्रोने दिली अपडेट; LVM-3 रॉकेटचा ‘हा’ भाग यशस्वीरित्या पॅसिफिक महासागरात कोसळला

The post Jalgaon Crime : रखवालदाराचा खून करणारे दोघेही पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी रखवाली करणाऱ्या रखवालदाराचा (दि. 14) च्या रात्री दोन अज्ञातांनी खून केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बिडवाणी या ठिकाणावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील वावळदा ते म्हसावद दरम्यान बिलवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटर हीटर पळवून …

The post Jalgaon Crime : रखवालदाराचा खून करणारे दोघेही पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Go to Source