Nagar : अण्णा हजारे यांच्यासह 5334 सभासद मतदानास पात्र

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर सैनिक बँकेच्या अपात्र सभासदांपैकी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 5334 सभासद पात्र झाले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिली. याबाबतच्या हरकतीवर आज (दि.18) सुनावणी होणार आहे. त्यानंतर अपात्र सभासदांबाबत अंतिम निर्णय होणार आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम सध्या चालू … The post Nagar : अण्णा हजारे यांच्यासह 5334 सभासद मतदानास पात्र appeared first on पुढारी.

Nagar : अण्णा हजारे यांच्यासह 5334 सभासद मतदानास पात्र

पारनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पारनेर सैनिक बँकेच्या अपात्र सभासदांपैकी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 5334 सभासद पात्र झाले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिली. याबाबतच्या हरकतीवर आज (दि.18) सुनावणी होणार आहे. त्यानंतर अपात्र सभासदांबाबत अंतिम निर्णय होणार आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम सध्या चालू आहे. 29 मेपासून यादी प्रसिद्ध झाली होती.
त्यादिवशी 4794 सभासद पात्र व 6099 अपात्र सभासदांची मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. मतदानासाठी अपात्र झालेल्या सभासदांना जुलै ते ऑक्टोबरमध्ये पात्र होण्यासाठी नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानुसार अपूर्ण असलेल्या शेअर्स रकमेचा भरणा करून 5334 सभासद पात्र झाले आहेत. त्यांच्याकडील अपूर्ण रकमेचा भरणा करून बँकेच्या पोट नियमाप्रमाणे व सहकार कायद्याप्रमाणे मतदानासाठी पात्र झाले आहेत. मतदार यादीवरील हरकतींवर आज निर्णय होणार आहे. दि.26 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिली.
अण्णांकडून अपूर्ण रकमेचा भरणा
बँकेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा हजारे यांचे प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी वेळेस शेअर्स अपूर्ण असल्याने ते मतदानासाठी अपात्र होते. परंतु, बँकेचे चेअरमन शिवाजीराव व्यवहार, काही संचालक, अधिकारी यांनी हजारे यांना बँकेचा याबाबतचा पोट नियम व सहकार कायद्याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अपूर्ण शेअर्स रकमेचा भरणा केला. त्यामुळे ते मतदानासाठी पात्र झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी सांगितले.
The post Nagar : अण्णा हजारे यांच्यासह 5334 सभासद मतदानास पात्र appeared first on Bharat Live News Media.

Go to Source